बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

II उम्मीद-ए- वफ़ा II

II उम्मीद-ए- वफ़ा II
*********************
बड़ी अजीब होती है यह प्यार की दास्ताँ
नहीं कोई खता फिर क्यों होते है खपा..
बेवफाई आलम देखो छाया है यहाँ वहा
फिर भी रखते है क्यों उम्मीद-ए-वफ़ा...!!
************************सुनिल पवार....

II मिलन II

II मिलन II
***********
उलघडता हळुवार आठवणीचे पदर
खुलले तुझ्या भाव विश्वाचे दालन..
जोपासले मी आजवर जपले हळुवार
उपरोक्ष तुझ्या होते आठवणीत मिलन..!!
************************सुनिल पवार.......

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

।। महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा ।।

।। महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा ।।
********************************
जपता मंत्र ॐ नमः शिवाय
आचरण होते शुद्ध मनाचे..
करील जो स्मरण शिवाचे
होतील मनोरथ पूर्ण त्याचे..!!
******ॐ नमः शिवाय*****
 

II सांगायचे आहे काही तुला II

II सांगायचे आहे काही तुला II
*****************************
सांगायचे आहे ग तुला बरेच काही..
कळत नाही तू ऐकणार तरी कधी..??
वाट पाहतोय मी अजूनही त्या दिवसाची..
अन विचार करतोय..
कानातला इयर फोन तू काढणार तरी कधी..!!
***********************सुनिल पवार......

।। प्रीत अबोल ।।

।। प्रीत अबोल ।।
***************
प्रीत अबोल नजर बोलते
बासुरीचे मधुर सुर छेड़ते
क्षण सारे इथेच थबकले
राधा कृष्णचै जगास वेड ते..!!
************सुनिल पवार....

।। मन ।।

।। मन ।।
नेहमीच माझं असं होतं
मन तुझ्या भोवती फिरतं
आज नक्की सागायचं ठरतं
पण न बोलताच माघारी फिरत..!!
************सुनिल पवार....

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

।। किस्मत का खेल ।।

।। किस्मत का खेल ।।
*******************
मिलना बिछड़ना है
किस्मत का खेल
जब तक है साथ
रखो दिलो का मेल..!!
******शुभ रात्री******
************सुनिल पवार....

।। परतफेड ।।

।। परतफेड ।।
************
हिरमुसल्या माझ्या मनास
आता लेखणीचा आधार..
मनाची माझ्या तीच
सव्याज परतफेड साभार..!!
********सुनिल पवार...

।। च्या मारी प्रॉमिस डे च्या ।।

।। च्या मारी प्रॉमिस डे च्या ।।
************************
आज सखु मला म्हणली
सख्या एक प्रॉमिस हवाय..
म्या म्हणलं राखाडीनं घास की
लवंग वाली पेस्ट संपली हाय..
अन पैसं भी...
************सुनिल पवार..
 

।। रूप ।।

।। रूप ।।
********
रूप तुझे भिजलेले
नयनी माझ्या सजलेले
मन तुझे बावरलेले
अन माझे तुझ्यात हरवलेले..!!
**************सुनिल पवार...

।। च्या मारी टेडी डे च्या ।।

।। च्या मारी टेडी डे च्या ।।
*********************
सखु आली लाडात
म्हणली टेडी आणा राया..
इतकं दिस मागं लागलो
समदचं गेलं वाया..
म्या राहिलो बाजूला
लागली टेडीस मिठी माराया..!!
*************सुनिल पवार....

।। च्या मारी चॉकलेट डे च्या ।।


।। च्या मारी चॉकलेट डे च्या ।।
*********************
सखुला म्या चॉकलेट दिलं
म्हणलं खा की फुकटे..
खाल्ल कमी तोंडाला माखलं
पांढऱ्याच काळ माकड़ झाल
काढले चार चौघात वाभाडे..!!
******सुनिल पवार...
 

।। प्रेम धारा ।।

।। प्रेम धारा ।।
************
बरसल्या धुंद अशा प्रेम धारा
चिंब चिंब मी नखशिखांत सारा..
मिळावा सखे मज मिठीचा उबारा
अंगाला झोंबतो गार गार वारा..!!
*****************सुनिल पवार....
 

।। च्या मारी प्रपोज डे च्या ।।

।। च्या मारी प्रपोज डे च्या ।।
**********************
सखुला म्या प्रपोज केलं..
ह्रदय काढून हातात दिलं..
लक्ष तीचं भलतीकडच होतं
म्हणली...सख्या
लायसन आताच भिकुला दिलं..!!

******सुनिल पवार...

|| च्या मारी रोज डे च्या ||

|| च्या मारी रोज डे च्या ||
********************
रोज रोज ची तिची भूणभूण ऐकून
आज मी तिला पांढरा रोज दिला
मग रंगावरुन तिने पुन्हा मला डोस दिला..
मझया शरणांगतिला असा तिने हरताल फासला..!!
************************सुनिल पवार........

।। जात पंचायत ।।

।। जात पंचायत ।।
*******************
नाही कसलेच काम विधायक
जातीची ह्यांना भलतीच पंचायत..
म्हणवती स्वतःस जातीचे संरक्षक
नाडत आले पिडितास आजगायत..!!
***********सुनिल पवार....

।। कमळ ।।

।। कमळ ।।
**********
जन्मले कमळ चिखलात
तरी निराळी त्याची बात..
कर्म श्रेष्ट नाही हो जात
सिद्ध करी जन मनात..!!

********सुनिल पवार......

।। सारीपाट ।।

।। सारीपाट ।।
************
आयुष्य जसे सारीपाट
नियतीचा असतो डाव
खेळावा आपण निःसंकोच
ठेवून मनात शुद्ध भाव...!!
*******सुनिल पवार....

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

।। चाँद ।।

।। चाँद ।।
*********
नजरेत चाँद आहे
धुंदीत रात्र आहे
कैफ हां निद्रेचा
स्वप्निल मात्र आहे..!!
(^_^) शुभ रात्री..!!
********सुनिल पवार.....

II मेघ पदर II

II मेघ पदर II
*************
वाटे मज नित्य
चंद्र तो दिसावा..
लपण्यास त्यास..
मेघ पदर नसावा..!!
***शुभ रात्री***
************सुनिल पवार.....

।। नाते तुझे माझे ।।

।। नाते तुझे माझे ।।
*********************
अबोल भाव मूक शब्द बोलले
नयनांनी अलवार भेद खोलले
शब्दांनाही पडावे अवचित कोडे
असे....
नाते तुझे माझे शब्दांच्या पलिकडले..!!
************************सुनिल पवार.....

।। रुसलेल्या नशीबास ।।

।। रुसलेल्या नशीबास ।।
********************
रुसलेल्या नशीबास ज़रा हसवुन पाहतो
रोज मला फसवतो आज त्याला हसवतो
जीवनाच्या नाण्याला दोन बाजू असतात
पटत नाही त्याला ज़रा पटवून दाखवतो..!!
*************सुनिल पवार....

II डाव II

II डाव II
********
प्रेम मला भासते जसा पत्त्याचा डाव
इथे राजा राणीस येतो भलताच भाव.
हरले जरी त्यात सर्वस्व तुमचे आमचे
तरी खेळावासा वाटतो पुन्हा एक डाव..!!
**********************सुनिल पवार.........
 

II प्रीत पतंगाची II

II प्रीत पतंगाची II
******************
प्रीत पतंगाची कशी आगळी वेगळी..
झेप घेई पतंग, दिवा पंख जाळी..
नाही तरी खंत, नसे कुठलाच आरोप
समर्पणाचे नाव प्रेम, सिद्ध करी वेळो वेळी..!!
*****************सुनिल पवार........

।। मनातलं मन ।।

।। मनातलं मन ।।
***************
घुसमटलेल मन व्यक्त होत काव्यात
आनंदलेल मन मुक्त होत काव्यात..
नुसतीच नसते हो शब्दांची जुळवणी
मनातल मन सुप्त असत काव्यात..!!
**************सुनिल पवार.........

II दरवळ II

II दरवळ II
***********
गंध फुलांचा का दरवळतो दुरवर
दरवळ म्हणू का म्हणू गहिवर..
साल काट्याची ती मानावी कुठवर
सोज्वळ नजरही आता रुतते खोलवर..!!
**********************सुनिल पवार.......

।। जीवलग ।।

जिवलग..
तुझ्या अनोख्या प्रेमाचे दर्शन
मला सलग होत असते..
नेहमीच माझ्या जीवाला छळून
मलाच जीवलग म्हणत असते..!!
***सुनिल पवार...✍🏽

।। जिंदगी ।।

।। जिंदगी ।।
**********
जिंदगी के राह पर
चलना तू संभलकर
इम्तेहान लेती है जिंदगी
रंग बदल बदल कर..!!
********सुनिल पवार

II भक्तीची शक्ति II

II भक्तीची शक्ति II
*****************
भक्तीच्या ह्या शक्तीला
नसे कोणतीच तोड..
अवडंबर ते नसावे
असावी कृतीची जोड..!!
*********सुनिल पवार...