चारोळी चकोर
मंगळवार, २६ एप्रिल, २०१६
|| गणित आयुष्याचे ||
==============
|| गणित आयुष्याचे ||
==============
आयुष्याची गणितच निराळी असतात...
क्षणमात्रे सुटल्या सारखी वाटतात...
अचानक काही समीकरणे बदलतात...
सर्वस्व उणे होते मात्र काही सेकंदात..!!
****सुनिल पवार....
|| विरोधाभास ||
|| विरोधाभास ||
=◆=◆=◆=◆=◆=
दुष्काळ...
पेटलेल्या, होरपळलेल्या गावात
पाण्याचा भीषण दुष्काळ होता..
हा विरोधाभास का आभास न जाणे
मात्र बाटलीबंद सुकाळ होता..!!
***सुनिल पवार....
✍️
मंगळवार, १९ एप्रिल, २०१६
II मुलाकात II
II शुभरात्री II
========
छोटीसी है रात
और लंबे खयालात..
मूँद के आँखे
अब करते मुलाकात..!!
****सुनिल पवार....
सोमवार, १८ एप्रिल, २०१६
II चैत्र सोहळा II
II चैत्र सोहळा II
==========
फुलला सुर्याचा मळा
रंगला चैत्र सोहळा..
सजे पळस स्वागता
लेऊन केशर टिळा..!!
******सुनील पवार....
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)