शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

|| निवडुंगा ||

|| निवडुंगा ||
========
कुंपणावरचा निवडुंग तू काटेरी
ना येणार प्रेम तुझ्या वाट्याला..
मखमली फुलांच्या त्या विश्वात
नव्हतीच जागा कधी काट्याला..!!
*****सुनिल पवार...✍🏽

II पर्वत II

पर्वत..

जरी आली विशाल वादळे
तरी पर्वत निश्चल दिसतात..
पण किंचितशा ओलाव्याने
मुरूम जसे विरघळतात..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| नजराणा ||

|| नजराणा ||
=========
हळुवार शब्दांचा नजराणा
मी तुझ्यासाठीच आणला..
तुझ्याच सुखासाठी सखे
मी शब्द कधी ना ताणाला..!!
****सुनिल पवार....

II पहाट II

🌹सुप्रभात🌹
==========
नेहमीच होते पहाट
प्रसन्न मनमोहक..
तरीही का व्हावं मग
मन नाहक विद्रोहक..!!
***सुनिल पवार..✍🏽😊

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

II आकाश II

🌺सुप्रभात🌺
==========
नजरेतले आकाश
मार्ग जरा खडतर
मनानेही व्हावे आता
तितकेच कणखर..!!
***$p...✍🏽

|| हुरहूर ||

|| हुरहूर ||
======
उठलेल्या काहुरात
असते मनाची हुरहूर..
आठवण समीप अन
असते ती दूरदूर..!!
***$p...

II मूक भावना II

🌺सुप्रभात🌺
==========
असतील जरी का त्या भावना
मूक अव्यक्त..
न सांगावे लागत जाणवतात सहज
ओल्या हृदयास फक्त..!!
****$p.....✍🏽

II भावना II

🌺शुभरात्री🌺
==========
निद्रिस्त ह्या भावना
जागवतेय कोण..
भिराभिरतात अंधारात
पाखरे स्वप्नाळू दोन..!!
***$p....✍🏽😊

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

II संवाद II

II संवाद II
======
माझ्या एकांताचा संवाद
छळतो माझ्याच मनाला..
किती बोलावे लेखणीने
का ओरबाडावे कागदाला..!!
*****सुनिल पवार....