बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

II असता तू जवळ II

II असता तू जवळ II
============
असता तू जवळ सखे
मज नसते ग कसलीच तमा..
जगास साऱ्या करून उणे
मी असतो केवळ तुझ्यात जमा..!!
****सुनील पवार....

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

II फाटक्या माझ्या गोधडीला II

🌺शुभरात्री🌺
👀=====👀
फाटक्या माझ्या गोधडीला
आता शिवायला मी घेतलंय..
जग डोकावतंय छिद्रातून
बाईस्कोपची मजा लुटतंय..!!
***सुनिल पवार..✍🏽

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

II थंडीचे दान II

🌺सुप्रभात🌺
==========
घेऊन आली पहाट
गुलाबी थंडीचे दान..
उठेल जो लवकर
त्यालाच मिळेल मान..!!
****सुनिल पवार...✍🏽

अंगणातल्या तुळशीस

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
=================
अंगणातल्या तुळशीस
आला मंजुळेचा बहर..
रोम रोमास सुखावते
पहाटेची शीत लहर..!!
***सुनिल पवार....

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

🌺दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=
चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
***सुनिल पवार...✍🏽