रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

का..?

का..?
====
का काटेच देते हे जग
फुलांच्या बदल्यात..?
ना जाणे हे जग गुंतले
कोणाच्या बदल्यात..??
***सुनिल पवार...✍🏼

आरसा

आरसा..

हा आरसा का हल्ली
माझी दिशाभूल करतो..?
मी न्याहाळतो स्वतःस
पण चेहरा तुझा दिसतो..!!
--सुनिल पवार..✍🏼

|| मी/तू ||

|| मी/तू ||
=======
मी वाऱ्याचा वावर
तू निशिगंधाचा बहर..
मी आतुरतेचा क्षण
तू धुंद रात्रीचा प्रहर..!!
***सुनिल पवार...✍🏼

7,

शिशिराच्या अंगणात

🌺सुप्रभात🌺
::::::::::::::::::::
शिशिराच्या अंगणात
धुक्याचे पाऊल पडते..
शुभ्र मोत्यांची झूल
पानाफुलांवर चढते..!!
***सुनिल पवार...✍🏼

रविवार, १० डिसेंबर, २०१७

||मौनातला शब्द||

||मौनातला शब्द||
:::::::::::::::::::::::
शांत वाटणारा डोह
अंतरी खोल असतो..
तसा मौनातला शब्द
कधी अनमोल असतो..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌼सुप्रभात🌼शुभ सकाळ🌼

|| आकर्षण ||

|| आकर्षण ||
=========
लोक चेहरा पाहतात केवळ
हृदय रुदन करते कोपऱ्यात..
आकर्षणाचा पगडा कालांतरे
जमा होणार सहज उपऱ्यात..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| पळस ||

|| पळस ||
======
पेटलेल्या पळसाचा
दाह मना जाणवला..
झुळुकभरसा वारा
मात्र निमित्त ठरला..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| वात ||

|| वात ||
======
थेंब थेंब हा गळून जातो
अन आभाळाचे आकाश होते..
भासते ती पणती मिणमिणते
पण वात जळून प्रकाश देते..!!
***सुनिल पवार..✍🏼


|| दिलजले ||

|| दिलजले ||
========
दिल जला चुके है हम
अब डर नही लगता आग से..
हा डर यह जरूर है के
कही पिघल ना जावू अनुराग से..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

|| कस्तुरी ||

|| कस्तुरी ||
=======
दरवळणाऱ्या गंधासाठी
का गं होतेस तू वेडीपीसी..
हे चंचल हरिणी मृगनयनी
तुझं आहे केवळ तुजपाशी..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| जिंदगी ||

|| जिंदगी ||
========
अक्सर लोग कहते है के
जिंदगी होती है जीने के लिए..
मगर तुम्हे देखा तब जाना के
जिंदगी है सिर्फ समाने के लिए..!!
***सुनिल पवार...✍🏼



|| अक्सर ||

|| अक्सर ||
========
अक्सर हम महफ़िल में
साथ रौनक को ले जाते है..
लोग रौनक चुरा लेते है और
बदले मे मायूसी दे जाते है..!!
***सुनिल पवार...✍🏼🤣

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

|| कोजागिरी ||

|| कोजागिरी ||
=========
कलेकलेचे खेळ खेळता
चंद्र छबी दुधाळ न्हाली..
कोजागिरीच्या चांदण राती
सखे तुझी आठवण आली..!!
***सुनिल पवार...✍🏼

=========
कलेकलेचे खेळ खेळता
चंद्र छबी दुधाळ न्हाली..
कोजागिरीच्या चांदण राती
सखे तुझी आठवण आली..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| नभपरी ||

|| नभपरी ||
========
रंग तिसरा हा करडा
साडी भरजरी लेवून आली..
उत्सवाच्या या उत्साहात
सखी नभपरी होऊन आली..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| दुःख ||

|| दुःख ||
=======
कवटाळले तर छळते
पिटाळले तरच पळते..
आपले आपण ठरवावे
ते इतरांस कुठे कळते..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌸सुप्रभात🌺शुभ सकाळ🌸

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

|| माय ||

|| माय ||
======
माय थापटे भाकर पृथ्वीवर
अर्पते चुलीस देहाचे सर्पण..
अन्नपूर्णा ती साऱ्या जगाची
लेकरासाठीचे अनोखे समर्पण..!!
***सुनिल पवार...✍🏼

🌸जास्वंद🌸

🌸जास्वंद🌸
==========
जास्वंदीच्या फुलाचं सुद्धा
आपलं असं सौंदर्य असते..
सुगंध नसला जरी फुलाला
देवाधिकास ते प्रिय असते..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌺सुप्रभात🌸शुभसकाळ🌺