शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

|| प्रश्न ||

|| प्रश्न ||
=====
देखल्या देवा दंडवत
तसे सगळेच करतात..
पण प्रश्न खरा हा आहे
यात भक्त कोण असतात..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| जुल्मी ||

|| जुल्मी ||
=======
जुल्मी असतात डोळे
न भिडवताही भिडतात..
अनोळखीच्या ओळखीवर
नकळत जीव जडतात..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| क्षण ||

|| क्षण ||
=====
कधी कधी आपल्या आयुष्यात
असेही क्षण वाट्यास येतात..
आपले दुःख बाजूला सारून
दुसऱ्याचे अश्रू पुसावे लागतात..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌻सुप्रभात🌻शुभ सकाळ🌻
👇🏽
"वळणावरच्या वाटा ५९", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/xgoHIN4nWhcr…
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

ll हे मेघा ll

शुभरात्री* 🌜
=======
सरत चालली रात्र
आता किती वाट पाहू
पाहू दे ना मुखचंद्रमा
हे मेघा जरा दूर हो पाहू..!!
**सुनिल पवार...✍🏼

ll आयुष्य ll

ll आयुष्य ll
========
सारं आयुष्य गेले तुझी वाट पाहण्यात..
किती मार्गक्रमण केले वाटा जुळण्यास..
झाला उशीर जरा, परी खंत ना मनाला
इतकेही पुरेसे आहे जीवन जगण्यास..!!
***सुनिल पवार... 

|| इंतजार ||

|| इंतजार ||
=======
आप ने कहा दिया है
तो इंतजार कर लेता हूं..
रुकी हुई सांसो को
फिर से भर लेता हूं..!!
**सुनिल पवार...✍🏼

|| नाते ||

|| नाते ||
======
कधी शब्दांपुरते नसते नाते
त्या पलीकडेही पाहावे लागते..
तसे फसवेच असतात शब्द म्हणा
त्यांना हृदयातून तपासावे लागते..!!
***सुनिल पवार...✍🏼
सुप्रभातशुभसकाळ

ll दान ll

|| सुप्रभात ||
========
देऊन विसाव्याच दान
निशा पावली अंतर्धान..
नवस्वप्नांना जागवीत
उषा प्रकटली प्रकाशमान..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll ऐक ना एकदा ll

ऐक ना एकदा
=========
भावनेला शब्द फुटेना
मी प्रयत्न केला अनेकदा..
माझ्या मौनातला शब्द
तू ऐक ना एकदा..!!
***सुनिल पवार...✍️

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ll काजळ ll

शुभरात्री...🌜
काळ्या भोर कुंतलातुनी
ती चंद्र तारे माळून आली..
जणू रात्रीचे करून काजळ
ती डोळ्यात सजवून आली..!!
***सुनिल पवार...✍️

ll एक ओळ ll

एक ओळ..☝🏼
पुरेशी आहे एक ओळ, जोखण्या बळ..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll फुल ll

एक ओळ...☝🏼
फुल वाऱ्यावर झुलते, नजरेत भरते..!!
***सुनिल पवार....✍🏼

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

|| मन ||

|| मन ||
=====
समजून घ्यावे मनास
फार विचित्र असते मन..
निरनिराळ्या रंगाचे
अनोखे चित्र असते मन..!!
***सुनिल पवार...✍🏼

ll कधी कधी ll

कधी कधी
कोणाला समजून घेण्यासाठी
शब्दांना सहज फिरवावे लागते..
काही जणांना ते समजत नाही
त्यांना चुचकारून भरवावे लागते..!!
***सुनिल पवार...✍️

ll बोलाची कढी ll

बोलाची कढी...😄
बोलणे सहज सुलभ असते
पण निभावणे तितकेच कठीण..
धरणीला आभाळ नेहमीच म्हणते
मी क्षितिजात तुला भेटेन..!!
***सुनिल पवार....✍🏼

ll शीत लह ll

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
दवात भिजलेली
शुभ्र धुक्याची चादर..
शिशिरात रोमांचित
पहाटेची शीत लहर..!!
**सुनिल पवार...✍️

ll रात्र ll

रात्र सुखनैव होण्यासाठी
निद्रेच्या आधीन होऊया..
स्वप्न सत्यात उतरण्यासाठी
आधी स्वप्न तर पाहूया..!!
🌛शुभरात्री......🍁
सुनिल पवार...✍️

ll प्रवास ll

प्रवास...
छोटासा एक कवडसा
बाकी अंधार भरलेला..
कुठे चाललो कळेना
तरीही प्रवास ठरलेला..!!
***सुनिल पवार....✍🏼

ll दिल ll

तुटे हुए..

*टूटे हुए आईने में लोग तस्वीर नही देखते*
*मगर टूटे दिल मे प्यार देखा जा सकता है..!!*
***सुनिल पवार...✍🏼

ll तू भेटलीस ll

एक ओळ...☝️
तू भेटलीस अन् मी हरवलो..!!