🌻
🌻सुप्रभात
🌻
🌻 ===============
इंसानकी इंसानियतसे
होती रहे अक्सर बात..
इसी तमन्नाओं से
दुवा के लिए उठे है हाथ..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🌻सुप्रभात
🌻 ==========
वेळ नसतो कोणाकडे
मात्र वेळ काढायला हवा..
अवेळी तुटण्याआधीच
मेळ साधायला हवा..!!
***सुनिल पवार....
✍🏼
|| जीवनानुभव ||
===========
अजब भासतो जीवनानुभव
हा खेळ रंगतो नित्य अभिनव
किती जिंकले डाव आजवर
अंती सरणावरती जळते शव..!!
***सुनिल पवार...
✍
🌻 आनंद
🌻
==========
छोट्या छोट्या गोष्टीतही
आनंदाचा भाव असतो..
इवल्याश्या दवबिंदूचाही
मोतीय स्वभाव दिसतो..!!
***सुनिल पवार...
✍🏼
| हास्य ||
======
हास्यामागील भाष्य
तू समजून घे जरा..
प्रसन्न करतो मनास
एक सुंदर चेहरा हसरा..!!
**$p..
✍
|| वास्तव ||
========
पचत नाही कुणास वास्तव
हे खरे वास्तव आहे..
वास्तवाची वास्तविक मागणी
तितकीच अवास्तव आहे..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🙂
🌻सुप्रभात
🌻
🙂|| चेहरा ||
🙃 ==========
चेहऱ्यामागचा चेहरा,
सहजासहजी दिसत नसतो..
प्रकाशित दिव्याखालीही,
नित्य अंधार वसत असतो..!!
***सुनिल पवार...
✍