शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

!! जय भवानी जय शिवाजी !!

 
!! जय भवानी जय शिवाजी !!
===================
महाराष्ट्र भूमीशी राखतो ईमान
ही मराठी बोली आमची शान
शत शत नमन तुम्हास राजे
तुम्हीच आमचा सार्थ अभिमान...!!
***सुनिल पवार...✍🏼

|| घे जाणून ||

|| घे जाणून ||
========
तू मागितली प्रेम कविता
मी तर वाहिले पुष्प तुला..
वाच ना माझे नयन जरा
अन जाणून घे कवितेला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| ज्योतिबाची ज्योत ||

|| ज्योतिबाची ज्योत ||
============
तुम्ही प्रज्वलित केली ज्योत
अजूनही प्रखर तेवते आहे..
शिकली सावरली सावित्री
साऱ्या जगास उजळते आहे..!!
***सुनिल पवार...✍🏼
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼