रविवार, २९ जुलै, २०१८

|| तुझ्या ओढीने ||

|| तुझ्या ओढीने ||
===========
तुझ्या ओढीने मेघ
आसमंतात जमून येतात..
बरसावे का न बरसावे
प्रश्न मनास करून जातात..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| क्षण ||

|| क्षण ||
======
असतात काही क्षण खळखुळून हसवणारे..
तर काही असतात नकळत टिपूस गाळणारे..
क्षण हे असेच असतात आठवणीस गाठणारे..
वळणावरच्या वाटेवर अकस्मातपणे भेटणारे..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌻सुप्रभात🌻शुभ सकाळ🌻

|| उशीर ||

|| उशीर ||
======
जरी उशीर झाला तरी
तू समजून घे मला..
तुला भेटायचे असते गं
लपवून साऱ्या जगाला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| पाऊस ||

पाऊस..

पावसाचं एक बरे असते
तो कोसळून मोकळा होतो..
कोण बुडाला कोण तरला
त्याला कुठे फरक पडतो..!!
--सुनिल पवार..✍🏼
(आगामी कादंबरी "वळणावरच्या वाटा" मधून)

|| भाव ||

|| भाव ||
======
समजू नको तू
भाव खोटा आहे..
जरा का असेना
प्रेमाचा साठा आहे..!!
**सुनिल पवार...✍🏼

|| शब्द ||

|| शब्द ||
======
बोलू नको काही
मी समजून घेईन..
तुझ्या मौनातला
मी शब्द होईन..!!
**सुनिल पवार..✍🏼

|| दुःख आणि मी ||

|| दुःख आणि मी ||
============
दुःखाला मी म्हणालो,
जरा हसून दाखव..
त्याने चार अश्रू ढाळले
म्हणाला, पुसून दाखव..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| चल बांधूया ||

|| चल बांधूया ||
=========
या तटी मी
त्या तटी तू..
चल बांधूया
मनाचा सेतू..!!
**$p..✍🏼

|| इंद्रधनुष्य ||

इंद्रधनुष्य..

राहू नको ग अशी कोरडी
जाणून घे पावसाचे रहस्य..
भिजवणारं त्याचं मन
अन् ओठावरचे इंद्रधनुष्य..!!
--सुनिल पवार..✍🏼

पावसा

पावसा..

तुझ्या स्पर्शाने मात्र
पत्थराचा परीस झाला..
तुझ्या प्रेमात त्यानेही 
अंगिकारले हिरवळीला..!!
--सुनिल पवार..✍🏼

|| वचन ||

|| वचन ||
======
तू पाळणार नाहीस वचन
याची खात्री होतीच मला..
सबब मी सांगणार नाही
तू विचारून बघ मनाला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| शब्द ||

|| शब्द ||
======
शब्दांपुरते नसते हे नाते
त्या पलीकडे पाहायला हवे..
तसे फसवेच असतात शब्द
अंतःकारणातून तपासायला हवे..!!
***सुनिल पवार...✍🏼
सुप्रभातशुभसकाळ

|| अट्टाहास ||

|| अट्टाहास ||
========
दोन शब्द पुरेसे असतात
वेड्या मनास समजावण्यास..
तुलाही ते समजून यावेत
म्हणूनच तर हा अट्टाहास..!!
***सुनिल पवार...✍🏼