गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

एकांत..😷

एकांत..😷
नको वाटतो संग कोणाचा
भला वाटतो मज एकांत..
नको प्रश्न, ना कसली खंत
व्हावे मनाने निःचिंत शांत..!!
**सुनिल पवार..🖋️

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

गुलाब...🌹

गुलाब...🌹
जपून ठेव गं सखे
मी दिलेला गुलाब प्रेमाचा..
सुकला तरी सुगंध देईल
हा गुणधर्म आहे त्याचा..!!
***सुनिल पवार...✍️
🌹Happy Rose Day🌹

देखावे...

देखावे...
समजून अजाण बनणे
कोणी तुझ्याकडून शिकावे..
तरी तू रंगवलेल्या चित्रांचे
मज भावतात देखावे..!!
***सुनिल पवार...✍️

🐻Happy Teddy Day🐻

🐻Happy Teddy Day🐻
देख कितना बडा है
टेडी तेरा दिवना..
तू मान मेरा कहना
उसे अपना बनाना..!!
**सुनिल पवार...✍️

Happy Kiss Day...💞

Happy Kiss Day...💞
ऐकण्यात आलंय
आज मुका दिवस हाय..
म्हणूनच की काय
कुणी बोलतच नाय..!!😀
***सुनिल पवार...✍️

कशास..🤔

कशास..🤔
ते बांधतात गुलाबी इमले
त्यांना सहज जमते ते..
मग काठावर बसून उगाच
नाव कशास ठेवतात ते..!!
***सुनिल पवार...✍️

अमर जवान....

आज ओशाळला असेल मृत्यूही
हे वीर जवाना, तुझे कलेवर पाहून..
सांडून आपले रक्त, देश रक्षणार्थ
तू हृदयात आहेस अमर होऊन..!!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

प्रेम...

प्रेम...
इतकंच मला कळतंय
की प्रेम निरंतर असावे..
जरी वाढत गेले अंतर
तरी हृदयातून तपासावे..!!
***सुनिल पवार..✍️

सय...

सय...
मी काय म्हणणार दुसरं काही
तुझ्याशिवाय काही विषय नाही..
असा एकही क्षण दिसत नाही
ज्यात मी आणि तुझी सय नाही..!!
***सुनिल पवार...✍️

प्याला..

प्याला..
तुम्ही काही म्हणा,
प्याला अर्धा भरलेला
की अर्धा रिता..
इतके मात्र खरे
तुमचा दृष्ट्रीकोन ठरवतो
तुम्ही मिळवता की गमावता..!!
***सुनिल पवार..✍️

काहूर...

काहूर...
हे वागणे तुझे असे की,
काहूर उठवतात मनात..
आता उठव हा कनात
अन् वादळ क्षमव क्षणात..!!
***सुनिल पवार...✍️

अधीर मन..

अधीर मन..
अधीर मन हे माझे
सांग तुला कसे कळावे..
माझ्या मनाचे छळणे
आता तुजकडे वळावे..!!
**सुनिल पवार..✍️

पण..

पण..
तशी शब्दांची गरज नसते..
प्रेम व्यक्त करायला..
पण मनास वाटत राहते
तुला हवे ते कळायला..!!
***सुनिल पवार...✍️

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९