मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

।। शुभ रात्री ।।

।। शुभ रात्री ।।
************
निजली पाखर घरटयात
चंद्र करितसे निगराणी
चांदण्याच्या सहवासात
धुंद दरवळते रातराणी..!!
**************
सुनिल पवार
【चकोर】

II आई बाप II


II आई बाप II
*************
शब्दांच्या बुडबुड्यात शोधतो मी जीवनाचे सार
तेच सार वास्तवात दाखवतात आई बाप..
सर्व समर्पणात लपले असते खरे समाधान..
दाखवून देतात आपणास आपले आई बाप..!!
************
सुनिल पवार
[चकोर]


।। आधार ।।

।। आधार ।।
करतेस जसा तू साज शृंगार
माझ्या शब्दास दे तसाच आधार
ताटकळले बघ ते तुझ्या दारात
नको करू ग जीवनात अंधार..!!
सुनिल पवार
[चकोर]
 

।। याचना ।।

।। याचना ।।
***********
याचना तरी किती करावी..
बहाणे तुझे नित्याचे झाले..
का विरह वेदनेस भाळी लिहिले
तुझ्याविना जगणे असह्य झाले..!!
****************
सुनिल पवार
【चकोर】

।। संकल्प ।।

।। संकल्प ।।
***********
धकाधकीच जीवन आपल
संकल्प त्यास हवे कशाला
हातावर पोट घेवून फिरतो
आणि दगड असतो उशाला..!!
*************************
सुनिल पवार
【चकोर】

।। गल्ला ।।

।। गल्ला ।।
*********
गल्ला भरू बाजार भरला
गल्ला कुठे मागे राहिला
साठवण्याच्या ह्या प्रक्रियेला
जो तो बँक म्हणू लागला..!!
**********************
सुनिल पवार
【चकोर】

।। व्यथा ।।

।। व्यथा ।।
**********
काजळ माझ्या आयुष्याचा
रंग तरी काय सांगवा..
राब राबुन शेतात अंती
देह फासावर टांगावा..!!
***********
सुनिल पवार
【चकोर】

II शिंपला II


II शिंपला II
***********
मोत्यांपेक्षा मला शिंपलेच अधिक भावतात..
सुंदर मोती त्या शिंपल्यात जन्मतात..
तुम्ही म्हणाल काय आहे त्या शिंपल्यात
मातेच मन आणि ममत्व असते त्यात..!!
************
सुनिल पवार
[चकोर]
 

मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

।। सुप्रभात ।।

उगवला दिनकर..

उगवला दिनकर उजळली दिशा
जाग आली फुलांच्या देशा!
पहाट समयी प्रेमे बहरली
मधुकण टिपण्या पाखरे भिरभिरली!!
--सुनिल पवार..

II बाती II

बाती..

दिया सिर्फ दिखाई दिया
मगर बाती को क्यो भूल गये!
वो जलती रही रात भर
उसने कितने घर रोशन किये..!!
--सुनील पवार..
***शुभ रात्री***


II हकदार II

II हकदार II
************
इंसान जैसे प्रस्थान करता है..
हकदार खुदबखुद आ जाते है..
वह ईश्वर भी सोचता होगा..
न जाने कहा से पैदा होते है..??
**************
सुनिल पवार
[चकोर]

।। सुखाची पोटली ।।


।। सुखाची पोटली ।।
******************
स्वार्थी ह्या दुनयेत
सांता कधी भेटेल का..
सर्व सुखाची पोटली
दुरितांस तो वाटेल का..??
सुनिल पवार
【चकोर】

II गुन्हा II


II गुन्हा II
*********
तोच राग तुझा जूना
का आळवशी तू पुन्हा
सारेच तुझे खेळ मनाचे
काय असा घडला गुन्हा..!!
**************
सुनिल पवार
[चकोर]

।। आयुष्य ।।

।। आयुष्य ।।
***********
आयुष्य हे असच असायच
वर्तमानात घर करून राहायच
भूतकाळास मागे सारत
भविष्याकड़े नजर रोखून पहायच..!!
*****************************
सुनिल पवार
【चकोर】


।। एकांत ।।

।। एकांत ।।
***********
मन एकांत एकांत
नसे कसला अंत
वादळ फ़िरे मनात
भासे नीरव शांत..!!
****************
सुनिल पवार
【चकोर】


II पुतळा मेणाचा II

II पुतळा मेणाचा II
**********************
प्रेमाची परिभाषा इथे प्रत्येकाची वेगळी असते..
जीवनाचे अंतिम सत्य मात्र प्रेम असते..
राग, लोभ, स्वार्थ असतो मात्र काही क्षणाचा..
मानवी देह असतो जसा पुतळा मेणाचा..!!
*************
सुनिल पवार
[चकोर]


शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

।। सावली ।।

।। सावली ।।
एकट्या माझ्या प्रवासात
आता सावलीची साथ आहे
काजळल्या दिशा जरी
पाठीशी अदृष्य हात आहे..!!
सुनिल पवार
【चकोर】


।। बळी ।।

।। बळी ।।
निसर्गाच्या लहरीपणात
बळी जातो बळीचा
सरकारी मदत हल्ली
मुद्दा बनलाय कळीचा..!!
सुनिल पवार
[चकोर]


।। अदा ।।


।। अदा ।।
***********
एक तुझी अदा निराळी
अल्लड अशी जराशी भोळी..
लावण्यवती तू रत्नाची खाण जशी..
ओसंडून वाहते ग गुणांची झोळी..!!
**************************
सुनिल पवार
[चकोर]
 
 

:::: II वक्त II ::::


:::: II वक्त II ::::
****************
किसीके लिए बनवाया था ताजमहल
मगर वक्त ने बना दिया उसे कबर..
वक्त कब, किसे, कहा सुला दे क्या खबर
फिर क्या शाहजहाँ और क्या अकबर ..!!
******************************
सनिल पवार
[चकोर]
 

मंगळवार, ९ डिसेंबर, २०१४

****शुभ रात्री****


****शुभ रात्री****
***************
निशेच्या निलांगणात
सावल्यांचा खेळ रंगला
निद्रेच्या सहवासात
माणूस स्वप्नात दंगला..!!
सुनिल पवार
[चकोर]

।। उत्तर ।।

।। उत्तर ।।
तुझ्या उत्तराने मी
नित्य संभ्रमात पडतो
हे खरे का ते खरे
प्रश्न नव्याने पडतो..!!
सुनिल पवार
[चकोर]


।। मोहब्बत ।।

।। मोहब्बत ।।
किसीको हसाती तो किसीको रुलाती है
ये मोहब्बत भी अजीब रंग लाती है..
चाहने का जूनून सबपर सवार होता है
फिर भी मोहब्बत नसीबवालो मिलती है..!!
सुनिल पवार
[चकोर]


।। तमाशा ।।

।। तमाशा ।।
आयुष्य झालाय तमाशा माझा
बोर्डावर नाचते ही गरीबी आहे
वखवल्या नजारा जाळती देहा
रोज मरून मी जीवित उभी आहे..!!
सुनिल पवार
[चकोर]


|| दुवा ।।

|| दुवा ।।
जर आणि तर ला आता
मनात माझ्या जागा नाही
आठवणी शिवाय दुव्याचा
सांधण्या दूसरा धागा नाही..!!
सुनिल पवार
[चकोर]
 

।। एकांत ।।

।। एकांत ।।
माणसांच्या गर्दीत हल्ली मी एकटा असतो
मनात विचारांच काहुर, नसतो त्यास अंत
नसलेल्या ओंजळीत शोधतो निसटलेले क्षण
गुंतत चाललो अंतात, मी आणि माझा एकांत..!!
सुनिल पवार
[चकोर]



।। बोल अबोल ।।

।। बोल अबोल ।।
बोल मुक्याचे तू बोलू नको
भेद मनाचे तू खोलूं नको
जाणतो तुझे लटके बहाने..
वाऱ्यावर अशी तू डोलू नको..!!
सुनिल पवार
[चकोर]
 


बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

।। शुभ रात्री ।।

।। शुभ रात्री ।।
नभाच्या निल झुल्यात
झोका घेती चंद्र,तारे
पृथ्वी न्याहाळे कौतुके
गिरकी घेती मंद वारे..!!
सुनिल पवार
(चकोर)


II कैफियत II

II कैफियत II
तुझ्या प्रातारणेची कैफियत..
मी मनासमोर मांडली..
घेतल्या वचनांची लक्तरे..
का तू वेशीवर टांगली..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

II कसरत II

 II कसरत II
घटावर घट,घट डोईवर
समस्यांची जणू कसरत तारेवर
अवघड जरी ही वाट जीवनाची
असेल तरीही हास्य चेहऱ्यावर..!!
सुनिल पवार
(चकोर)


।। वेदना ।।

। वेदना ।।
वेदना माझ्या मनाची
नाही तुला कळणार
तुझ असमंजस वागणे
आता मलाच छळणार..!!
सुनिल पवार
(चकोर)


।। बाजार ।।

।। बाजार ।।
बाजार हल्ली यातानांचाही भरतो
वेदनेचा सर्वकश बोलीने भाव ठरतो
किती भर भरून दिले देवाने सर्वांना
तरी इथे नित्य रंक आणि राव रडतो..!!
सुनिल पवार
(चकोर)
 

।। वसुंधरा ।।

।। वसुंधरा ।।
वसुंधरेच्या घराला
सुंदर नभाचे आंगण
सूर्य चंद्राचे छत्र
सर्व सुखाचे रांजण..!!
सुनिल पवार
(चकोर)

।। आयुष्य ।।


।। आयुष्य ।।
फुलांच्या रंगाने आपण फुलावे
वाऱ्याच्या झोक्यावर मजेत झुलावे
छोटेसे जीवन सफल व्हावे
दरवळ रूपी अमर व्हावे..!!
सुनिल पवार
(चकोर)

।। नुपुर।।


।। नुपुर।।
नुपुराचे भासती दिवाने सारे
फिरते भोवती पिसाट वारे
वखवखल्या नजारा मी जाणते सारे
पोटाची आग कोणी जाणली का रे..!!
सुनिल पवार
(चकोर)