शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

।। चंद्र ।।

।। चंद्र ।।
********
कधी वृद्धि..कधी लुप्त..
अचंबित खेळ सारा..
आवस पुनवेत बंधिस्त..
जीवनाचा चंद्र पसारा..!!
***शुभ रात्री***
**************सुनिल पवार.....

।। चांदणं ।।

।। चांदणं ।।
**********
चंद्राच काय हो
तो चांदण्यात खेळतो
पण..
ज्याच्या मनात चांदणं
त्याचा जीव जळतो...!!
  ( ^_^ ) शुभ रात्री (*_*)

II घर II

II घर II
*******
जसे दुरून डोंगर साजिरे
तसे भासती परके गोजिरे..
भले माझे घर मातीचे
नको मज सोन्याचे पिंजरे..!!
***************सुनिल पवार...

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

II भूतदया II

II भूतदया II
*************
मनात असेल जर का भूतदया
तर मिळेल प्रत्येकाची माया..
जसे उन्हात तापून ते तरुवर
देतात तुम्हास शीतल छाया..!!
***************
सुनिल पवार..

II मैत्री II

II मैत्री II
*********
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात..!!
***सुनिल पवार...

II सौदागर II

II सौदागर II
************
सपनो के इस शहर मे
अजीब सौदागर गुजरते है..
झुटे मुठे सपने बेचकर...
हकीकत मे मुकरते है...!!
***सुनिल पवार.....

।।मन।।


।।मन।।
******
जाणायचेच असेल मन माझे
मनात तूला झाकावेच लागेल..
वाचशील जर का मन माझे
मन तुला राखावेच लागेल..!!
************सुनिल पवार......

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

।। साफल्य ।।


।। साफल्य ।।
************
फुलांच्या जीवनाचे
हेच का साफल्य म्हणायचे..
कधी देवाजवळ बसायचे
तर कधी मढयावर सजायचे..
सरते शेवटी
निर्माल्य होऊन जायचे..!!
*********सुनिल पवार....

।। शब्द फुले ।।

।। शब्द फुले ।।
************
देतो तो देव
घेते ते कर्म
पुरवतो तो धर्म
नष्ट करतो अधर्म
************
म्हणून म्हणतो
कर्म करा
माणुसकी धर्म पाळा
आणि
अधर्मा पासून दूर रहा
***सुनिल पवार...!!

।। आठवाणीचा गंध ।।

।। आठवाणीचा गंध ।।
******************
मार्ग होते एकच आपले
परी वाट तुझी चुकली
आठवाणीचा गंध देऊन
फुले ओंजळीत सुकली..!!
*********सुनिल पवार.....

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

II तात्पर्य II

II तात्पर्य II
***********
औट घटकेचे असते सौंदर्य
मोठे असते मनाचे औंदर्य
जपा त्या निर्मोही मनास
समजा म्हणण्याचे तात्पर्य..!!
***********सुनिल पवार

II जीवन संघर्ष II

II जीवन संघर्ष II
****************
जीवन एक संघर्ष आहे..
कधी दुखः कधी हर्ष आहे..
कधी कोरडे रुक्ष आहे..
तर कधी मखमली स्पर्श आहे..!!
*************
सुनिल पवार..

II कटाक्ष II

II कटाक्ष II
**********
मान वळवून सखे असे
क्रोधाचे द्वार खोलु नको..
बस एक कटाक्ष टाक..
बाकी काही बोलू नको..!!
************
सुनिल पवार

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*

II तिळगुळ घ्या II गोड गोड बोला II
***@@***
**मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा**
***************************************
म : मधाळ असावी नित्य वाणी
क : कटुता व्हावी सकल दूर
र : रत्नासम उजळावे जीवन सारे
स : सर्व सुखाचे यावेत घरात पुर..!!
क्रां : क्रांत व्हावे नित्य नवे यशों शिखर
त : तसेच जुळावे जीवनाचे सुर..!!
**************
सुनिल पवार
[चकोर]

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

II पतंग II

II पतंग II
**********
आयुष्याचा पतंग उंच लहरावा..
दोर मात्र त्याचा हाती असावा..
कधी सैल तर कधी घट्ट धरावा
पतंग जीवनाचा संतुलित दिसावा..!!
************
सुनिल पवार
[चकोर]

।। तिळगुळ घ्या ।। गोड गोड बोला ।।

।। तिळगुळ घ्या ।। गोड गोड बोला ।।
******************************
गुळाचा गोडवा ओठावर रुजावा
तिळाचा उबारा अंतरात असावा
संक्रातीचा असतो हाच सांगवा
शीत लहरित समतोल राखावा..!!
***********
सुनिल पवार
[चकोर]

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

।। अपना पराया ।।

।। अपना पराया ।।
***************
हमारा क्या है जो अपने पास रखेंगे.
जहा का है सब वही छोड़ जाएंगे
फिर क्यों यह अपना वह परया
भगवान समजते हम मेहमान जो घर आया...!!
***********
सुनिल पवार
[चकोर]

।। ज्योती ।।


।। ज्योती ।।
**********
अंधारास उजळते जशी ज्योती
मनास भावते तशीच प्रिती..
बघ ज़रा तू डोळे उघडून
नांदतात कसे दिवा आणि वाती..!!
***********
सुनिल पवार
(चकोर)
 

।। ग्वाही ।।


।। ग्वाही ।।
*********
दिली होती प्रेमाची ग्वाही तू दिवस उगवताना..
सांज झाली तुझी पावले वळली हळूच माघारी..
कळवंडले क्षितिज सारे मन मनाचे माझे
नाही उगवाला दिवस पुन्हा तो माझ्या दारी..!!
***********
सुनिल पवार
[चकोर]
 

।। आठवण ।।


।। आठवण ।।
***********
सुटले जरी हात आपले
समजू नको मज एकाकी
सर्वस्व हिरावले तू माझे जरी
आठवण अजुन आहे बाकी..!!
*************
सुनिल पवार
[चकोर]

||खरे प्रेम||


||खरे प्रेम||
*********
नशीबवान असतात ती माणसे ज्यांना प्रेम मिळते
खस्ता खाव्या लागतात नाहीतर प्रेम मिळण्यासाठी
प्रेम मिळूनही काही कमनाशिबी ठरतात
आयुष्य जाते मित्रांनो खरे प्रेम कळण्यासाठी..!!
*************
सुनिल पवार
[चकोर]
 

||आभास||


||आभास||
*********
जीवघेण्या ह्या एकांतात
तुझा आभास देतो हात..
आठवण असते सोबतीस
अन नयन निर्झर वाहतात..!!
**********
सुनिल पवार
[चकोर]
 

मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

II चांद तारे II

चाँद तारे तुझ्या भाळी
माझ्या नशीबी रात्र काळी
तू रमली ग तुझ्या नभात
आठवण उरली माझ्या अंगणात..!!
*****शुभ रात्री*****
 

||अनोळखी ओळख||


||अनोळखी ओळख||
*****************
अनोळखी ओळख आपली
का ओढ तरी ही भेटीची..?
जशी गाठ ऋणानुबंधाची
जन्मो जन्मीच्या त्या प्रीतीची..!!
****************
सुनिल पवार
[चकोर]
 

।।शब्दांचे लेणे।।


।।शब्दांचे लेणे।।
*************
नाही कोणास देणे घेणे
तरी लागतो मी तुझे देणे
भग्न अवस्थेत उभे आहे
माझे शब्दांचे हे लेणे..!!
***************
सुनिल पवार
[चकोर]