शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

|| माय ||

|| माय ||
======
माय थापटे भाकर पृथ्वीवर
अर्पते चुलीस देहाचे सर्पण..
अन्नपूर्णा ती साऱ्या जगाची
लेकरासाठीचे अनोखे समर्पण..!!
***सुनिल पवार...✍🏼

🌸जास्वंद🌸

🌸जास्वंद🌸
==========
जास्वंदीच्या फुलाचं सुद्धा
आपलं असं सौंदर्य असते..
सुगंध नसला जरी फुलाला
देवाधिकास ते प्रिय असते..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌺सुप्रभात🌸शुभसकाळ🌺

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

|| नदी की धारा ||

|| नदी की धारा ||
===========
दिल की लगी ऐसी ही होती है
बिन बोले सब कुछ कहती है..
जैसे सागर के मिलन को देखो
नदी की धारा हरदम बहती है..!!
****सुनिल पवार....✍🏼😊

|| पाऊल ||

|| पाऊल ||
=======
खडकातून वाहणारे जळ निर्मळ
भावते मनास अन दिसते सुंदर..
पण जपून टाकावे पाऊल त्यावर
कारण शेवाळीचा असतो त्यावर थर..!!
****सुनिल पवार...✍🏼😊
🌸सुप्रभात🌸

|| यु ही ||

|| यु ही ||
======
उम्र रफ्तार चलती रही
रात यु ही ढलती रही..
अरमान लिये दिल मे
लौ मगर जलती रही..!!
***सुनिल पवार..✍🏼😊

|| थेंब ||

|| थेंब ||
=====
थेंबा थेंबातुन सागर बनतो
तरी थेँबास कोण सागर म्हणतो.?
त्या लाटेतही बघ तोच वसतो..
किनाऱ्यासाठी जो आतुर दिसतो..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| आठवण ||

|| आठवण ||
========
कधी असते दूर दूर ती
कधी नकळत समीप येते..
कधी अंधार लपेटून घेते
तर कधी नंदादीप होते..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| चाँद ||

|| चाँद ||
======
एक चेहरा प्यारा सा
ना आया नजर कही..
ऐ बादलो में छिपे चाँद
कही तुम वह तो नही..!!
***सुनिल पवार..✍🏼🌝