मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

माफी...🙏🏼

माफी...🙏🏼
खदखद भरून राहते मनात
उद्रेकाची वाट कशास पहावी..
वर्ष सरण्यात वेळ निघून जाते
जेव्हाच्या तेव्हाच माफी मागावी..!!
***सुनिल पवार...✍🏼

तुझा प्रश्न

एक ओळ...☝️
मी कुठे मौन आहे, तुझा प्रश्न गौण आहे..!!
***सुनिल पवार...✍️

सांजरंग...

सांजरंग..

सांजरंग उडून जातात
अन् कातरवेळ येते भरून..
अवचित तरळते चंद्रमुख
अन् चांदण्या जातात ओघळून..!!
🌄..शुभसांज..🌄

मिश्किली…🤓

मिश्किली…🤓
साहित्याच्या मांदियाळीत
प्रत्येकाचा स्वतंत्र ग्रुप दिसतो…
तिथेच त्याला आधार मिळतो
तोच आय डी प्रूफ असतो..!!
***सुनिल पवार…✍️

जुल्फे...

जुल्फे...
इन बिखरे हुए रेशमी जुल्फों में
हम कुछ इस तरह उलझ गए..
के चाहकर भी खुद को छुड़ा ना सके
और वह भी हमे समझ ना पाए..!!
***सुनिल पवार....✍️

धडे...

धडे...
इतके मात्र खरे की सगळेच धडे
पुस्तकातुन शिकवले जात नाहीत..
काही धडे जीवनातूनही मिळतात
ते मात्र पुसता पुसले जात नाहीत..!!
***सुनिल पवार...✍️

परिणीती...

परिणीती...
जशी अंधार उजळते ज्योती
तशी डोळ्यास भावते प्रिती..
वात जळते अन् मेण वितळते
हीच प्रेमाची खरी परिणीती..!!
***सुनिल पवार....✍️

भ्रम..

भ्रम..
तुझ्या खोट्या बहाण्यांना
मी खरा कायम समजतो..
तुला क्षणिक आनंदाचा
तो केवळ भ्रम असतो..!!
***सुनिल पवार...✍️

आच..

आच..
जेव्हा गारठलेल्या देहाला
वाऱ्याचा जाच होतो..
तेव्हा पहाटेचा सूर्य त्याला
मायेचे आच देतो..!!
***सुनिल पवार...✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

पण कधीतरी...?

पण कधीतरी...?
म्हणत नाही नेहमीच
पण कधीतरी म्हटल्याप्रमाणे वाग..
हा तर केवळ अनुराग
तू समजू नको मी आळवतोय राग..!!
***सुनिल पवार....✍️

चित्र...

रंगसंगतीचे चित्र अनोखे
देखणे सर्वात उठून दिसते..
सूर्याचे पाहिले किरण जेव्हा 
भूमीवरती अलगद उतरते..!!
***सुनिल पवार...✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

लिखित..

लिखित..
समजू नका की,
मी काहीच लिहीत नाही..
इतकेच की,
माझे लिखित वहीत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

चष्मा...🤓

चष्मा...🤓
प्रसंग ताणण्यापेक्षा
जाणणे गरजेचे असते..
चष्मा हा अभ्यासू हवा
तेव्हा कुठे वाचता येते..!!
***सुनिल पवार....✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

भाव...

भाव...
कोणाचा वधारलेला भाव
कमी व्हायला वेळ लागत नाही..
ज्याने भाव वाढवून ठेवला
तोही मग त्याला ठेवत नाही.!!
**सुनिल पवार...✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

कदाचित..

कदाचित..
असेल तुला गर्व कदाचित
पण मलाही माझा स्वाभिमान आहे..
तुला टाळण्यास आता केलीय सुरवात
हे तर त्याचेच प्रमाण आहे..!!
***सुनिल पवार...✍️

वेदना...२

वेदना...
ती नकोशी वाटते जीवनात,
तरी तिचे बोल भावतात..
कवितेच्या भावविश्वात, 
वेदनेचे दिवाने दिसतात..!!
***सुनिल पवार...✍️