रविवार, २७ डिसेंबर, २०१५

|| पहाट समयी ||

��सुप्रभात��
=●=●=●=
उठा उठा श्री महागणपती
पहाट समयी करितो आरती..
सुखकर्ता तू दुखःहर्ता तू
जीवन रथाचा तूच सारथी..!!
��������������
****सुनिल पवार.....

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

|| प्यार ||

|| प्यार ||
======
अडो ना तुम यु जिद पर सनम
जिद से ना कुछ हासिल होता..
प्यार होता है मेल दिलो का
हर कोई इसके ना काबिल होता..!!
******सुनिल पवार......

II मेल II

II मेल II
●●●●●●
दिलो के मेल में ना होता
कुछ तेरा और कुछ मेंरा..
समर्पण भाव से ही होता
प्यार मीठा और गहरा..!!
****सुनिल पवार....

II ठेवा ध्यानी II

II ठेवा ध्यानी II
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
ज्याचे त्याने ठरवावे
नेमके काय कसे करावे..
इतके ठेवा ध्यानी मात्र
करावे तसेच लागते भरावे..!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
****सुनिल पवार......

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

II खेळ प्रेमाचे II

II खेळ प्रेमाचे II
=========
खेळ न्यारे असे प्रेमाचे
कधी उन कधी सावलीचे..
कधी उन्मळती वृक्ष जसे
कधी नव पालवी रुजवातीचे..!!
*****सुनील पवार....

II सोय II

II सोय II
=======
एकाचा अस्त तर दुसऱ्याचा उदय
प्रेमाचे असावे असेच काही प्रमेय..??
म्हणतात सारे बदल श्रुष्टीचा नियम
प्रेमही पाहते का अशीच काही सोय..!!
**********सुनिल पवार.....

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

II हृदय II

II हृदय II
=======
दगडाने सुद्धा विरघळावे
असेच माझे प्रेम आहे..
घालशील किती आवरण कठोर
हृदय तुझेही सेम आहे..!!
*********सुनील पवार....

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

|| ती ||

|| ती ||
=====
कोरले नाव तिने असे काळजावर..
सदैव आसपास भासतो वावर..
नयन पटावर तीच छबी उमटुन
कसा घलावा मी मनास आवर...!!
*********सुनिल पवार.....

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

II रूप मनोहर II

II रूप मनोहर II
===========
नाना विविध रुपे तुझी
मोहविती माझ्या मनाला..
पाहता तुझे रूप मनोहर
भान हरपे क्षणा क्षणाला..!!
******सुनिल पवार.......

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

|| मागणे ||

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
=================
।। मागणे ।।
=======
काय मागु मी मागणे देवा..?
माणसास असते सऱ्याची ददात..
देणार असशील तर इतकेच दे बाप्पा
माणुसकी वसु दे प्रत्येक माणसात..!!
����������
******सुनिल पवार......

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

|| असर ||

|| असर ||
=======
मेरी हर सोच में अब
सिर्फ तुम्हारा ही बसर है..
क्या यह मेरी सोच है..??
या तुम्हारे प्यार का असर है..!!
*******सुनिल पवार......

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

|| पोळा ||

|| पोळा ||
======
बैलांप्रती कृतज्ञता म्हणून
सण असतो पोळ्याचा..
माझ्या मनाच्या सोहळ्याचा
ढवळ्या अन पवळ्याचा..!!
****सुनिल पवार....

|| विरून गेल्या ||

|| विरून गेल्या ||
===========
अंधारल्या वस्त्या साऱ्या
निशेच्या कुशीत विसावल्या..
एक वृक्ष उभा एकाकी
विरून गेल्या सावल्या..!!
**************सुनिल पवार......

|| शब्दफुल ||

|| शब्दफुल ||
=========
दिसले उणे दूसऱ्याचे
अंतर्मनात ना पाहिले...
अंधारातच मग का
तू शब्दफुल वाहीले..!!
*****सुनिल पवार....

मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

II हास्याच्या ओंजळीत II

II हास्याच्या ओंजळीत II
================
जगास हसवतो मी
स्वतःस फसवतो मी..
हास्याच्या ओंजळीत..
दुःखास लपवतो मी..!!
******सुनिल पवार.....

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

II मैत्रीचे नाते II

II मैत्रीचे नाते II
==========
पाण्यावर लिहता येणार नाही कदाचित
पण पाण्यावर तरंगणारे लिहणे जमेल..
वाऱ्याच्या हिंदोळ्यावर मस्त झुलेल
मैत्रीचे हे नाते नित्य दरवळे फुलेल..!!
*****सुनिल पवार.....

II कांदा II

II कांदा II
======
कांदा झालासे कळस
परी ढासळला पाया..
गेली शेताची रया
सावकार जमवे माया..!!
*****सुनिल पवार.....

II राख II

II राख II
=====
दग्ध मनाचे अवशेष ख़ास
राख नसे ही माझी आस..
जळले जरी प्रेम चितेत
भटकते नित्य आसपास..!!
*******सुनिल पवार......

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

II जादुई II

II जादुई II
=======
मुक्त मोत्यांची उधळण
का निसर्गाची रोषणाई..
मुग्ध करी मन मनास
अदा तुझी ती जादुई..!!
*******सुनिल पवार.....

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

|| पाऊस पसारा ||

|| पाऊस पसारा ||
===========
 या सम नाही दूसरा
आयुष्य जसे पाऊस पसारा..
कधी मोहक इंद्रधनुचा नजारा
कधी नुसता चिखल सारा..!!
******सुनिल पवार....


II सजली रजनी II

II शुभरात्री II
========
सजली रजनी
चंद्र तारे लेवुन..
पाहतो नजारा
मुग्ध मी होवून..!!
****सुनिल पवार...

II तुझ्या आठवणीत II

II तुझ्या आठवणीत II
==============
तुझ्या आठवणीत माझा
दिवस सारा गेला..
अंधार दाटे मनात अन
रात्रीचा पसारा झाला..!!
*********सुनिल पवार.....

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

|| गुरुकुल ||

|| गुरुकुल ||
========
आदर्श गुरुकुल आता न राहिले
जगी शिक्षणाचे बाजार मी पाहिले..
शिक्षकांच्या जागी आता सम्राट आले
पैशाचे भुकेले नादार मी पाहिले..!!
*******सुनिल पवार......

गुरुवार, ३० जुलै, २०१५

II मृगजळातलेच भास II

II मृगजळातलेच भास II
*************************
चेहऱ्यावर चेहरे लावले असे की,
वाचले से भासले,बेरके निघाले..
भास होते ते मृगजळातलेच सारे
वाटले जे आपुले,परके निघाले..!!
********सुनिल पवार....

II ओळखीचे अनोळखी II


II ओळखीचे अनोळखी II
================
कधी अनोळखी ओळख
हळुवार मनात घर करते..
कधी ओळख अनोळखी जशी
वार तलवार नजर करते..!!
******सुनील पवार..

|| अपेक्षित / अनपेक्षित ||

|| अपेक्षित / अनपेक्षित ||
===============
अपेक्षेच ओझे
दुखःस कारण ठरते
निरपेक्ष कर्म
अनपेक्षित लाभ देते..!!
****सुनिल पवार.....

|| खेळ भातुकलीचा ||

|| खेळ भातुकलीचा ||
==============
खेळ तो भातुकलीचा
खेळ राजा राणीचा..
मनात मी जपलेला
अर्ध्यात परी संपलेला..!!
****सुनिल पवार.....

II दिनकर तो आला II


|| सुप्रभात || शुभसकाळ ||
================
दिनकर तो आला निसर्ग बहरला
मनमोहक मनोहर रंग तो ल्याला..
अलौकीक दिसे हा सृष्टीचा नजारा
ज्याने पाहिला तो सुखावला..!!
********सुनिल पवार.....
 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

|| आपल्या वाटे ||

|| आपल्या वाटे ||
===========
आयुष्याच्या मार्गात
असले जरी कैक काटे..
गुलाब बनून फुलायचे
चालायच आपल्या वाटे..!!
****सुनिल पवार....

::|| तालीम ||::

राजकीय  चिमटा
 ==========
::|| तालीम ||::
==========
राज्याची राजकीय तालीम
आता मस्त रंगणार..
जोर जीममधे काढून
ताव कोंबड़ी वड्यावर मारणार..!!
********सुनिल पवार........
😃😜

|| चिमटा ||

|| चिमटा ||
========
सत्ताधारी की विरोधक
काय बी कळना...
अन
सत्तेच्या भाऊ गर्दीत
विश्वास बी मिळना
****सुनिल पवार....
 

|| मिलाप ||

|| मिलाप ||
=======
कधी मिलन आलाप
कधी विरह विलाप..
प्रेमात दिसतो मज
असा आगळा मिलाप..!!
****सुनिल पवार.....

II विहंग II

🌹||सुप्रभात||🌹
×××××××××××××
स्वप्नांची झाली पहाट
उगवला सूर्य नभात..
आशेचे पंख लेवुन
विहंग विहारे गगनात..!!
****सुनिल पवार.....

बुधवार, २२ जुलै, २०१५

|| चिंब ||

|| चिंब ||
××××××
तू आलास अन
बेभान झालं मन
हो आता बेधुंद
चिंब भिजव तन..!!
****सुनिल पवार...

|| आठवण ||

|| आठवण ||
×××××××××
येता अंधार दाटून
आठवण बसते खेटून..
चांदण्यांची सैर होते
पुन्हा चंद्रास भेटून..!!
****शुभरात्री****
***********SP.....

|| ह्रदय द्वार ||

|| ह्रदय द्वार ||
××××××××××
तुज साठीच उघडले
मी माझे ह्रदय द्वार
सामाव रोम रोमात
पाहू नको अंत फार..!!
|| सुप्रभात ||
******सुनिल पवार.....




II लावण्य II

II लावण्य II

भासतेस मज जशी स्वर्गातली अप्सरा
भुलविते मनास लावण्य तुझं साजिरं..
चांदण्यांचा साज लेवुनी उतरली हृदयी
चंद्रापरी लखलखतं रुप तुझं गोजिरं !!
**सुनिल पवार..

II जाग II

|| सुप्रभात🌹शुभ सकाळ ||
××××××××××××××××××
पहाटेच्या प्रसन्नतेकडे
तू सुद्धा काही माग
नको मज काहीच
मात्र शब्दाला जाग..!!
****सुनिल पवार...

II तल्लीन II

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
××××××××××××××××××
वाऱ्याचे मंद वाहणे
सवे पाखरांचे गाणे..
भूपाळीच्या स्वरात जसे
तल्लीन होऊन जाणे..!!
******सुनिल पवार.....


।। अव्यक्त ।।

अव्यक्त..
अव्यक्त जरी असले
तरी प्रेम माझे नितळ आहे।
माझ्याच हृदयावर जणू
मीच ठेविला कातळ आहे।
--सुनील पवार..✍️
506
People Reached
30
Engagements
26

II दृष्टीकोन II

|| सुप्रभात ||
×××××××××
सौंदर्य नजरेत असते
मात्र दृष्टिकोण हवा..
सुंदर साज लेविते
सृष्टी नित्य नवा..!!
******सुनिल पवार....

सोमवार, १३ जुलै, २०१५

|| मेघा ||

|| मेघा ||
××××××
सुरकुतल्या मनास
दे उभारी मेघा..
रीते कर जलकुंभ
ये भेटण्या आवेगा..!!
****सुनिल पवार....

|| कवडसा ||

|| कवडसा ||
×××××××××
आशेचा एक कवडसा
देतसे मनास दिलासा..
मृगजळा परी जरी
मनी असंख्य अभिलाषा..!!
××××सुप्रभात××××
***********सुनिल पवार......

|| शिकवा ||

|| शिकवा ||
××××××××
लम्हों का इंतजार रहा
एक तेरे आने के लिए..
कोई शिकवा भीं न था
और तेरे बहाने के लिए..!!
🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार......

|| जिंदगी ||

|| जिंदगी ||
××××××××
ना जिसका कोई भरोसा,
वह इन्तेहाँ लेती जिंदगी..
छीन लेती है जीना कभी,
फिर भी केहलाती है जिंदगी..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार.....

शनिवार, ११ जुलै, २०१५

|| साज ||

|| साज ||

सौंदर्य नजरेत असते
मात्र दृष्टिकोण हवा..
सुंदर साज लेविते
सृष्टी नित्य नवा..!!
**सुनिल पवार..

बुधवार, ८ जुलै, २०१५

|| भाव ||


|| भाव ||
××××××
चेहऱ्यावर चेहरा
वाचणे मुश्किल
डोळ्यातून उमटती
भाव ते मिश्किल
😊🌺😊🌺😊
****सुनिल पवार...