गुरुवार, ३० जुलै, २०१५

II मृगजळातलेच भास II

II मृगजळातलेच भास II
*************************
चेहऱ्यावर चेहरे लावले असे की,
वाचले से भासले,बेरके निघाले..
भास होते ते मृगजळातलेच सारे
वाटले जे आपुले,परके निघाले..!!
********सुनिल पवार....

II ओळखीचे अनोळखी II


II ओळखीचे अनोळखी II
================
कधी अनोळखी ओळख
हळुवार मनात घर करते..
कधी ओळख अनोळखी जशी
वार तलवार नजर करते..!!
******सुनील पवार..

|| अपेक्षित / अनपेक्षित ||

|| अपेक्षित / अनपेक्षित ||
===============
अपेक्षेच ओझे
दुखःस कारण ठरते
निरपेक्ष कर्म
अनपेक्षित लाभ देते..!!
****सुनिल पवार.....

|| खेळ भातुकलीचा ||

|| खेळ भातुकलीचा ||
==============
खेळ तो भातुकलीचा
खेळ राजा राणीचा..
मनात मी जपलेला
अर्ध्यात परी संपलेला..!!
****सुनिल पवार.....

II दिनकर तो आला II


|| सुप्रभात || शुभसकाळ ||
================
दिनकर तो आला निसर्ग बहरला
मनमोहक मनोहर रंग तो ल्याला..
अलौकीक दिसे हा सृष्टीचा नजारा
ज्याने पाहिला तो सुखावला..!!
********सुनिल पवार.....
 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

|| आपल्या वाटे ||

|| आपल्या वाटे ||
===========
आयुष्याच्या मार्गात
असले जरी कैक काटे..
गुलाब बनून फुलायचे
चालायच आपल्या वाटे..!!
****सुनिल पवार....

::|| तालीम ||::

राजकीय  चिमटा
 ==========
::|| तालीम ||::
==========
राज्याची राजकीय तालीम
आता मस्त रंगणार..
जोर जीममधे काढून
ताव कोंबड़ी वड्यावर मारणार..!!
********सुनिल पवार........
😃😜

|| चिमटा ||

|| चिमटा ||
========
सत्ताधारी की विरोधक
काय बी कळना...
अन
सत्तेच्या भाऊ गर्दीत
विश्वास बी मिळना
****सुनिल पवार....
 

|| मिलाप ||

|| मिलाप ||
=======
कधी मिलन आलाप
कधी विरह विलाप..
प्रेमात दिसतो मज
असा आगळा मिलाप..!!
****सुनिल पवार.....

II विहंग II

🌹||सुप्रभात||🌹
×××××××××××××
स्वप्नांची झाली पहाट
उगवला सूर्य नभात..
आशेचे पंख लेवुन
विहंग विहारे गगनात..!!
****सुनिल पवार.....

बुधवार, २२ जुलै, २०१५

|| चिंब ||

|| चिंब ||
××××××
तू आलास अन
बेभान झालं मन
हो आता बेधुंद
चिंब भिजव तन..!!
****सुनिल पवार...

|| आठवण ||

|| आठवण ||
×××××××××
येता अंधार दाटून
आठवण बसते खेटून..
चांदण्यांची सैर होते
पुन्हा चंद्रास भेटून..!!
****शुभरात्री****
***********SP.....

|| ह्रदय द्वार ||

|| ह्रदय द्वार ||
××××××××××
तुज साठीच उघडले
मी माझे ह्रदय द्वार
सामाव रोम रोमात
पाहू नको अंत फार..!!
|| सुप्रभात ||
******सुनिल पवार.....




II लावण्य II

II लावण्य II

भासतेस मज जशी स्वर्गातली अप्सरा
भुलविते मनास लावण्य तुझं साजिरं..
चांदण्यांचा साज लेवुनी उतरली हृदयी
चंद्रापरी लखलखतं रुप तुझं गोजिरं !!
**सुनिल पवार..

II जाग II

|| सुप्रभात🌹शुभ सकाळ ||
××××××××××××××××××
पहाटेच्या प्रसन्नतेकडे
तू सुद्धा काही माग
नको मज काहीच
मात्र शब्दाला जाग..!!
****सुनिल पवार...

II तल्लीन II

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
××××××××××××××××××
वाऱ्याचे मंद वाहणे
सवे पाखरांचे गाणे..
भूपाळीच्या स्वरात जसे
तल्लीन होऊन जाणे..!!
******सुनिल पवार.....


।। अव्यक्त ।।

अव्यक्त..
अव्यक्त जरी असले
तरी प्रेम माझे नितळ आहे।
माझ्याच हृदयावर जणू
मीच ठेविला कातळ आहे।
--सुनील पवार..✍️
506
People Reached
30
Engagements
26

II दृष्टीकोन II

|| सुप्रभात ||
×××××××××
सौंदर्य नजरेत असते
मात्र दृष्टिकोण हवा..
सुंदर साज लेविते
सृष्टी नित्य नवा..!!
******सुनिल पवार....

सोमवार, १३ जुलै, २०१५

|| मेघा ||

|| मेघा ||
××××××
सुरकुतल्या मनास
दे उभारी मेघा..
रीते कर जलकुंभ
ये भेटण्या आवेगा..!!
****सुनिल पवार....

|| कवडसा ||

|| कवडसा ||
×××××××××
आशेचा एक कवडसा
देतसे मनास दिलासा..
मृगजळा परी जरी
मनी असंख्य अभिलाषा..!!
××××सुप्रभात××××
***********सुनिल पवार......

|| शिकवा ||

|| शिकवा ||
××××××××
लम्हों का इंतजार रहा
एक तेरे आने के लिए..
कोई शिकवा भीं न था
और तेरे बहाने के लिए..!!
🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार......

|| जिंदगी ||

|| जिंदगी ||
××××××××
ना जिसका कोई भरोसा,
वह इन्तेहाँ लेती जिंदगी..
छीन लेती है जीना कभी,
फिर भी केहलाती है जिंदगी..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार.....

शनिवार, ११ जुलै, २०१५

|| साज ||

|| साज ||

सौंदर्य नजरेत असते
मात्र दृष्टिकोण हवा..
सुंदर साज लेविते
सृष्टी नित्य नवा..!!
**सुनिल पवार..

बुधवार, ८ जुलै, २०१५

|| भाव ||


|| भाव ||
××××××
चेहऱ्यावर चेहरा
वाचणे मुश्किल
डोळ्यातून उमटती
भाव ते मिश्किल
😊🌺😊🌺😊
****सुनिल पवार...

|| मेल ||

|| मेल ||
×××××××
मेल हों तो, दिया बाती जैसा
जले बाती दिया आंच सहता..
बड़ी अजीब है यह प्रीत की रीत
लब खामोश और दिल बतियाता..!!
******सुनिल पवार.....

|| आशा ||

|| आशा ||
×××××××
कधीतरी होईल पहाट
मन मनाशी बोलत होते
असून काटे भोवताली
गुलाब त्यावर डोलत होते..!!
*******सुनिल पवार......

शुक्रवार, ३ जुलै, २०१५

|| प्रीत ||

|| प्रीत ||
××××××
तुझ्या विरहाचे गीत
झाले माझे मनमीत
वैराण त्या वस्तीत
आहे अजुन ओली प्रीत
****सुनिल पवार....

II स्वच्छंद II


II स्वच्छंद II
************
स्वच्छंदाचे छंद
देती मना आनंद...
उंच विहारे जैसा विहंग
मन स्वच्छंद स्वच्छंद..!!
**********सुनिल पवार....

गुरुवार, २ जुलै, २०१५

II शब्द फुल II

II शब्द फुल II
*************
मौनात तू बोलावे..
हळूच मी झेलावे..
नयन पापण्यांचे..
शब्द फुल व्हावे..!!
******सुनिल पवार....

|| जोकर ||

|| जोकर ||
×××××××
तो एक जोकर
साऱ्या दुनयेस हसवतो..
स्वतःच्या दुखाःस
मात्र बेमालूम फसवतो..!!

*****सुनिल पवार....

|| त्या क्षणाचा ||

धुंद त्या क्षणाचा..

धुंद त्या क्षणाचा
पाऊस अजुनही स्मरतो..
तुझ्या आठवणीत 
नेत्री पुन्हा भरून येतो..!!
--सुनिल पवार..

क्या होता है प्यार..??

क्या होता है प्यार..??
××××××××××××××
पूछा कई बार, हमने अपने आप से
ना मैंने जाना, ना ही उसने बताया
कहते है लोग, मीठा जहर है प्यार
जिसने भी किया, जीना छोड़ दिया..!!
*****************सुनिल पवार.....

II हुरहुर II

II हुरहुर II
**********
रुजवुन ओलावा का तोडला किनारा
मनात असंख्य प्रश्नांचे काहुर आहे..
आज मी झालो मग उद्या कोण असणार
लागली हळव्या मना हुरहुर आहे..!!
************सुनिल पवार.......