सोमवार, २९ जून, २०१५

|| मैत्री ||

|| मैत्री ||
××××××
कळत नकळत जुळतात ऋणानुबंध
अवचित देतात मनास आनंद
मैत्रीचा असतो सर्वांनाच छंद
पण मैत्री असावी निर्मळ स्वच्छंद...!!
*******सुनिल पवार....

|| नाते ||

|| नाते ||
××××××
नाते असावे पावसाच्या धारे सारखे
बरसता जसा मिळतो धरणीस रुजवात..
अल्लड नदिस अवचित मिळते त्याची साथ
सामावते निश्चिंत सागराच्या हृदयात..!!
******सुनिल पवार....

शुक्रवार, २६ जून, २०१५

II बळ द्या पंखांना II

II बळ द्या पंखांना II
*******************
घेऊ दया झेप मज गगनी
घालू द्या गवसणी स्वप्नांना..
खुडू नका अवेळी कळीला..
जगण्याचे बळ द्या पंखांना..!!
**********सुनिल पवार....

|| गंध ओल्या मातीचा ||

|| गंध ओल्या मातीचा ||
××××××××××××××××
तुझा सहवास मज हवा हवासा वाटे
मिटल्या पापण्यांतुन नित्य मज भेटे..
ओल्या मातीचा गंध तोच दरवळे
आठवांच्या वाटे नयनी नीर खेटे..!!

*******सुनिल पवार....

गुरुवार, २५ जून, २०१५

|| मत मतांतर ||

|| मत मतांतर ||
×××××××××××
असेनात का मत मतांतर
अंतरात ते नसावे अंतर
प्रेम असते पवित्र सुंदर
जे वसते हृदयी निरंतर..!!
******सुनिल पवार...



|| तोच पाऊस ||

|| तोच पाऊस ||
×××××××××××
पुन्हा तोच पाऊस
पुन्हा तोच चिखल
गुंतल्या ह्या नात्याची
व्हावी कशी उकल..!!
****सुनिल पवार....

मंगळवार, २३ जून, २०१५

:II मन मनात II

:::II मन मनात II:::
*******************
मन मनात चाले मनाचा खल
क्षण क्षणात झुकतोय तुजकड़े कल..
राहून राहून राहते तीच मनात सल
दूर जाशी तू अन प्रयत्न माझे विफल..!!
***********सुनिल पवार......

सोमवार, २२ जून, २०१५

:::II अबोल बोल II:::

:::II अबोल बोल II:::
********************
भावते मज तुझे अबोल रुसणे
न बोलताच सारे कथन करणे..
नयन शब्दानी हे असे खेळणे
शब्दंशब्द जणू हृदयावर कोरणे..!!
***********सुनिल पवार....

II राजी मी II

II राजी मी II
*************
दूर गेली माणसे ती
म्हणत होतो माझी मी..
सुखाचे होते सारे सोबती
दुखाःत माझ्या राजी मी..!!
********सुनिल पवार.....

।। काळीज बापाचं।।

।। काळीज बापाचं।।
******************
झिजल्या चपला झिजला देह
लेकास त्याची किंमत नाही..
अश्रु लपविते काळीज बापाचं
दुसऱ्या कोणात ती हिंमत नाही..!!
***********सुनिल पवार.....

रविवार, २१ जून, २०१५

|| बाबा ||

|| बाबा ||
×××××××
अंगा खांद्यावर वाढलो तुमच्या
खेळलो खेळ अंबर झूला..
तळ हातावर जपले आम्हा
जसा जपतो माळी फुला..!!
*****सुनिल पवार....
|| पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

शनिवार, २० जून, २०१५

|| पाऊस मुंबईचा ||

पाऊस मुंबईचा..

मुंबईच्या पावसाची निराळीच बात
ठप्प होते जन रहाट अकस्मात
कुठे उपभोग असतो मिळणाऱ्या सुट्टीचा
तर कुठे असते पोटा पाण्याची भ्रांत..!!
--सुनिल पवार..

|| आलम ||

|| आलम ||
×××××××
मदहोशी का आलम छाया है यहाँ वहा..
अब होश की बात ना करो तो अच्छा..
मैफिल रंग लायी है यारो अभी अभी..
अब रोष की बात ना करो तो अच्छा..!!
****सुनिल पवार....

|| साद ||

|| साद ||
××××××
कितीही होवोत पावसाशी वाद
भरभरुन मिळवतो तरीही दाद..
खुलावी कळी गालाची तुझ्या
नित्य घालतो मी पावसास साद..!!
😊😊😊
******सुनिल पवार......



गुरुवार, १८ जून, २०१५

|| आभाळाचे देणे ||

|| आभाळाचे देणे ||
××××××××××××
आभाळाचे देणे
जसे सृष्टिचे लेणे..
लेवून नवा साज
जसे कोणाचे होणे..!!
****सुनिल पवार....


II आलोय मी II

II  आलोय मी II
****************
आलोय मी एकदाचा
आता हौस पुरवून घे...
भिजुन घे मनसोक्त
ज़रा टवटवी लेवुन घे..!!
*******सुनिल पवार....

बुधवार, १७ जून, २०१५

|| श्वास ||

|| श्वास ||
×××××××
जगणे केवळ भास आहे
मनी कसली आस आहे
कळणार नाही तुज कधी
गुंतला माझा श्वास आहे..!!
*****सुनिल पवार......

||मुक्तछंदी मी||

||मुक्तछंदी मी||
××××××××××
मम मानाचा मुक्तछंदी मी
नाही वृत्तांत बंदी मी..
अजाण जरी शब्दांचा मी
भावनेत माझ्या आनंदी मी..!!
*******सुनिल पवार.....

|| साथ ||

|| साथ ||
×××××××
जशी पावसाची साथ धरेला
तशीच साथ दे तू मला..
धुंद बरसु दे प्रेम धारा..
चिब चिंब भिजु दे मला..!!
💦💦💦
******सुनिल पवार.....

सोमवार, १५ जून, २०१५

|| नजारा ||

|| नजारा ||
×××××××
बरसल्या जलधारा
वाहे बेभान वारा
नयन रम्य दिसे
पहाटेचा नजारा..!!
****सुनिल पवार....
🌹🌹🌹
 

|| मुग्ध लावण्य ||

|| मुग्ध लावण्य ||
×××××××××××
मला नावडतो पाऊस तुला आवडतो
तरीही हां पाऊसमनात घर करतो..
मुक्त तूज भिजवतो मुग्ध लावण्य सजवतो..
बाहेर पडणारा पाऊस मन माझे रिझवतो..!!
******सुनिल पवार...

|| जलबिंदु ||

|| जलबिंदु ||
×××××××××
प्रत्येकाच्या मनात असतो
पाऊस दाटलेला..
आठवांच्या पानास असतो
जलबिंदु खेटलेला..!!
*****सुनिल पवार....

|| आठवाणीचा पसारा ||

|| आठवाणीचा पसारा ||
💧💦💧💦💧💦
गत स्मृतींच मळभ दाटले मनात
बरसल्या आसवांच्या जल धारा..
वेचु तरी मी कोणत्या क्षणाला
तुझ्या आठवांचा किती हा पसारा..!!
💦💦💦
****************सुनिल पवार..........

|| पहिला पाऊस ||



|| पहिला पाऊस ||
××××××××××××
पहिला पाऊस, पाहिले प्रेम
विसरावे म्हटले, नाही विसरता येत..
तो धुंद मृदु गंध, ते मुग्ध लावण्य
तरळते नजरेत, येता तू सयेत..!!
💧💦💧💦💧💦💧
*******सुनिल पवार........

||पाऊस आला||

||पाऊस आला||
×××××××××××
थकला भागला एक ढग डोंगरावर विसावला
डोंगरलाही त्याचा नकळत लळा लागला..
शीतल वाऱ्याने अलवार छेडले मनाला
अवचीत फुटला बांध पाणी आले डोळा..
अन लोक म्हणाले..पाऊस आला पाऊस आला..!!
××××××सुनिल पवार....
💧💦💧💦💧💦💧
××××सुप्रभात मित्रहो××××

|| मंदिर ||

|| मंदिर ||
×××××××
नाही स्वप्न साकारले
नाही मी दुखः केले..
हृदयात तुज पूजिले
मंदिर तयाचे केले..!!
****सुनिल पवार..

|| पाऊस ||

|| पाऊस ||
××××××××
बाहेर पडणारा पाऊस
थैमान मनात घालतो..
तुझ्या विरहाचा खेळ
नित्य असाच चालतो..!!
*****सुनिल पवार.....

|| पहिला पाऊस ||

|| पहिला पाऊस ||
===========
पहिला पाऊस
सुखद अनुभूती
ओल्या मनाची
गंधाळली माती..!!
**सुनिल पवार..✍🏼

II कमळ दल II

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||

मोहक रंग धरले
कमल दल फुलले!
चिखलातल्या जीवनी  
नंदनवन फुलवले!! 
**सुनिल पवार..

बुधवार, १० जून, २०१५

|| हु तू तू ||


|| हु तू तू ||
×××××××
निःशब्द मी
संतप्त तू..
संपणार कधी
भडिमार हु तू तू..!!
😀😜😀😜
****सुनिल पवार....
 

|| मन नभास ||

|| मन नभास ||
××××××××××
हृदयातल्या अंधारास
तू चांदण्यांचा प्रकाश दे
काजळल्या मन नभास
तू चंद्राचा विश्वास दे..!!
*****सुनिल पवार....
××××|| शुभरात्री ||××××

मंगळवार, ९ जून, २०१५

||कवडसा||

|| सुप्रभात ||
×××××××××
आशेचा एक कवडसा
उजळतो जीवनाला
नको व्यर्थ भिती
दे दिलासा तू मनाला..!!
****सुनिल पवार.....
🌹🙏🌹🙏🌹

।। आलय ।।

।। आलय ।।
×××××××××
निषेच्या उदरात होतो
नित्य स्वनांचा उदय
मनात जपालय अजुन
तुझ्या मुर्तीच आलय..!!
*****सुनिल पवार....
::::::::::××××::::::::::
*****शुभ रात्री*****

|| चातकाचे मन ||


|| चातकाचे मन ||
××××××××××××
नाही मज हौस
भरलेल्या नभाची
चातकाचे मन माझे
तृषा एक थेंबाची..!!
****सुनिल पवार...

।। शमा परवाना ।।

।। शमा परवाना ।।
***************
हर पल घुट घुट के जलना
शमा के नशीब में होता है..
फिर भी सर पर कफ़न बाँध के
परवाना उसपे जान छिड़कता है..!!
*******सुनिल पवार......

||आयुष्याच्या प्रवास||


||आयुष्याच्या प्रवास||
×××××××××××××××
आयुष्य एक प्रवास
सुख दुखाःचा संमिश्र सहवास
मार्गातील चढ़ उतार
देतात अनुभव हमखास..!!
*****सुनिल पवार....

।। ओरखडे ।।

।। ओरखडे ।।
××××××××××
माझ्या मनाचे मृदु कवडसे..
का भासतात तुज ओरखडे..
बोललोच मी क्षुल्लक काही
म्हणतेस आवर रे बोल खड़े..!!
*******सुनिल पवार.....

।। हुस्न और अदा ।।


।। हुस्न और अदा ।।
×××××××××××××
यह हुस्न और यह अदा
कैसे ना होगा कोई फ़िदा
मत गुरुर कर हुस्न पर ज्यादा
इसको भी होना है, इक दिन जुदा..!!
*********सुनिल पवार.........

।। जाणता राजा ।।

।। जाणता राजा ।।
***************
एकच माझा जाणता राजा
शीश झुकते तुमच्या पुढे
तुमच्याच कृपेमुळे राजे
मराठी पाऊल पड़ते पुढे..!!
****सुनिल पवार....

शुक्रवार, ५ जून, २०१५

II दुटप्पी माणसा II

II दुटप्पी माणसा II
********************
हव्यासापोटी नष्ट केली जंगले..
परागंदा झाली सारी वनचरे..
:
दुटप्पी माणसा,
:
शोभत नाही रे तुझ्या मुखी
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे..!!
**********सुनिल पावार.....

II तो बात बन जाये II


II तो बात बन जाये II
*****************
बदलते है हालात, तो बदलते है इंसान
जुदाई होती लंबी और छोटी मुलाकात..
मिलते है इंसान कभी, ना मिलते खयालात..
मिल जाए दोन्हो अगर, तो बन जाये बात..!!
***********सुनिल पवार......

गुरुवार, ४ जून, २०१५

II रिती ओंजळ II

II रिती ओंजळ II
****************
रिती ओंजळ, मी भरू पाहतो..
आयुष्य बेधुंद, मी उधळू पाहतो..
मोह मार्गे, मी मृगजळी धावतो..
रिता असतो, मी रिताच जातो..!!
*********सुनिल पवार.....

बुधवार, ३ जून, २०१५

II एक झाड लाव अंगणी II

II एक झाड लाव अंगणी II
********************
 ओरबाडू नको वट वृक्षास
असे वट पोर्णिमे दिनी..
ऐक पक्षांची दीन वाणी
एक झाड लाव अंगणी..!!
******सुनिल पवार..

।। टोल ।।

।। टोल ।।
×××××××
झाले टोल आता मुक्त
राहिले मोजकेच फ़क्त
खुश रहा कार भक्त
आणि हो
व्होट दया आम्हाला फ़क्त..!!
*****सुनिल पवार.....

II प्रचीती II

II प्रचीती II
**********
रंगले हरीच्या रंगी
भक्ती रसात न्हावुनी..
देतसे प्रचीती कान्हा
प्रतिबिंबात रूप दावूनी..!!
******सुनिल पावर....

।। सुख ।।

।। सुख ।।
×××××××
हरविण्याच्या ह्या खेळात
तू जिंकावे असे नित्य वाटते
तुझ्या जिंकण्यातच खरे
माझे सुख मला भेटते..!!
*****सुनिल पवार....

।। चिटोरा ।।

।। चिटोरा ।।
×××××××××
आठणीच्या चिटोऱ्यातले
शब्द काही धूसर झाले
वाचले मी पुन्हा पुन्हा
अर्थ ना त्याचे अजुन लागले..!!
*******सुनिल पवार....
(चिटोरा = चिठ्ठी)

|| आतुर ||

|| आतुर ||
×××××××
येशील कधी परतून
झाला जीव हा आतुर
सख्या तुज पाहण्या
नयन झाले फितूर..!!
****सुनिल पवार....

।। चीकू ।।

।। चीकू ।।
×××××××
चीकू जरी नाव माझे
औदर्य माझे मोठे..
गोडवा माझ्या अंतरी
सांगत नाही खोटे..!!
****सुनिल पवार...