गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

|| निसर्ग ||

|| निसर्ग ||
=======
वसुंधरेच्या दारावर
निसर्ग बांधतो तोरण..
रंग उधळीत फुलांवर
तोही साजरा करतो सण..!!
***सुनिल पवार...✍🏼

विहंग

🌼 सुप्रभात 🌼
============
झाली स्वप्नांची पहाट
सूर्य उगवला नभात..
पंख लेवुन आकांक्षांचे
विहंग विहरे गगनात..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| व्यथेची कथा ||

|| व्यथेची कथा ||
============
आज मी जाणली आहे
माझ्या अंतरीची व्यथा..
प्रश्नचिन्हांनी भरलेली
जाणून घे माझी कथा..!!
***सुनिल पवार...✍🏼
(आगामी कादंबरी "वळणावरच्या वाटा" मधून)

|| अक्सर ||

|| अक्सर ||
=======
जिंदगी अक्सर धोका खाती है
और हम अपने आप को कोसते है..
कुछ दाग आईने पर भी होते है
और हम चेहरा साफ करने लगते है..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| प्रश्न ||

|| प्रश्न ||
=====
प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता
कधी प्रश्नच दिशाहीन भटकतात..
तसेही प्रत्येक प्रश्नांची उत्तरे
हल्ली समर्पक तरी कुठे मिळतात..!!
--सुनिल पवार...✍🏼
*सुप्रभात🌞शुभ सकाळ*
भारत जगताप, Vrushali Sanap Kale and 20 others
10 Comments
Like
Comment
Share

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

|| औषध ||

|| औषध ||
=======
गुंतल्या मनास सोडविण्यासाठी
मन नव्याने गुंतवावे लागते..
काळाच्या जखमा भरण्यासाठी
काळाचेच जालीम औषध लागते..!!
***सुनिल पवार....✍🏼

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

|| गृहीत ||

|| गृहीत ||
=======
कोणी गृहीत धरू नये
कुणाच्या सहनशीलतेला..
तुमची कृतीच होईल कारण
तिच्या अकाली अंताला..!!
***सुनिल पवार...✍🏼
शुभ सकाळ

|| मायबाप ||

|| मायबाप ||
========
तीच आहे जुनी वाट
तसाच आहे जुना रस्ता..
मुलांच्या भविष्यासाठी·
मायबाप खाती खस्ता..!!
***सुनिल पवार...✍️

|| कव-टाळणे ||

 || कव-टाळणे ||
==========
टाळणे आणि कवटाळणे
यात दोन अक्षरांचा फरक असतो
तुझ्यात अन् माझ्यात तोच फरक आहे
तू नेहमीच टाळत आलीस
अन् मी उगाच कवटाळत राहिलो..!!
***सुनिल पवार...✍🏼

खेळ...

खेळ...
=====
शब्दांचे खेळ असतात सारे
मनाला भुरळ घालणारे..
अभावानेच दिसून येतात
वास्तवात मन सांभाळणारे..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| पाठ खाजवणी ||

|| पाठ खाजवणी ||
=============
पाठ खाजवणीच्या खेळात
त्यांचे बरे हात पोहचतात..
मला ते जमतच नाही
माझे हात थिटे पडतात..!!
***सुनिल पवार...✍🏼😄

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

|| गृहलक्ष्मी ||

|| गृहलक्ष्मी ||
=========
सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी येते
करता पूजन तिचे आनंदे नांदते..
जग तिलाच हो गृहलक्ष्मी म्हणते
करता सन्मान खरे सौख्य लाभते..!!
***सुनिल पवार....✍🏼
*लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा*

|| बलिप्रतिपदा ||

*बली प्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा*
=====================
पडव्याचा सण आज
प्रतिपदेची सुवर्ण पहाट..
एकोप्याचे पाऊल टाकू
धरू मानवतेची वाट..!!
***सुनिल पवार...✍🏼

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

|| नियती ||

|| नियती ||
=======
काही गोष्टी चुकवण्याचा
माणूस आटोकाट प्रयत्न करतो..
पण प्रबळ असते नियती
तिच्यापुढे तो हतबल ठरतो..!!
***सुनिल पवार...✍🏼
Image may contain: one or more people and nature