चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ जून, २०२२

तुजसाठीच वाटे

तुजसाठीच वाटे..


तुजसाठीच वाटे सजावे धजावे

तव शब्दांचे तनुवर मोरपीस फिरावे..

स्पर्श नजरेचा मन मोहरून जावे

अन् क्षणाने घ्यावे क्षणाचे विसावे..!!

--सुनील पवार..

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

मी शोधतोय उत्तर

 मी शोधतोय उत्तर..

मी शोधतोय उत्तर
माझ्याच मनाच्या प्रश्नाचं।
तू जोडून घे ना तुझ्या मनाशी
आणि उत्तर दे त्याचं।
--सुनील पवार..

अजूनही पाखराला

 अजूनही पाखराला..

अजूनही पाखराला
वेड आकाशाचे आहे।
जरी अंधार दाटलेला
स्वप्न प्रकाशाचे आहे।
--सुनील पवार..

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

गंध अक्षरांचा

 गंध अक्षरांचा..

गंध अक्षरांचा कळेल जेव्हा
अर्थ शब्दांना मिळतील तेव्हा।
भावनांचे मोहोळ उठतील जेव्हा
डंख कवितेचे छळतील तेव्हा।
--सुनील पवार..✍️

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

तृप्तीचा ढेकर..

 तृप्तीचा ढेकर..


कुणाच्या पोटात 

कधी शिरता येत नाही

भरलेलं पोट हल्ली 

तृप्तीचा ढेकर देत नाही।

--सुनील पवार..✍️

गुरुवार, ३० जुलै, २०२०

असं म्हणतात..

असं म्हणतात..

शब्दांनाही रंग असतात
शब्दांनाही गंध असतात..
शब्दफुलांना ओविता
कवितांचे हार बनतात..!!
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात असं म्हणतात.. शब्दांनाही रंग असतात शब्दांनाही गंध असतात.. शब्दफुलांना ओविता कवितांचे हार बनतात..!! काव्यचकोर... Your urQuote.in'
779
People Reached
49
Engagements
27
2 Shares
Like
Comment
Share

शनिवार, २५ जुलै, २०२०

ही वाट जाते कुठे..

ही वाट जाते कुठे..
ही वाट जाते कुठे कळेना
मज माणूस कुठे भेटेना।
किती भास वाटेत उजडाचे
मनी काळोख मिटता मिटेना।
--सुनील पवार..✍️
564
People Reached
37
Engagements
25
2 Comments
4 Shares
Like
Comment
Share

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

|| शब्द ||

|| शब्द ||
शब्दांपुरते नसावे नाते
त्या पलीकडे सुद्धा पाहायला हवे..
तसे फसवेच असतात शब्द
त्यांस अंतःकारणातून तपासायला हवे..
--सुनील पवार..✍️
🌺सुप्रभात🌞शुभसकाळ🌺

415
People Reached
27
Engagements
14