मंगळवार, ३१ मार्च, २०१५

II रातराणी II

II रातराणी II
**************
चंद्राच्या शीतल प्रकाशात..
प्रीत अलवार मोहरून आली..
गंधाळले श्वास श्वासात..
आणि..
रातराणी बहरून आली..!!
*********सुनिल पवार.....

।। काटेरी वाटेकरी ।।


।। काटेरी वाटेकरी ।।
******************
भासले निवडूंग जरी काटेरी
तरी निसर्गाचे ते ही वाटेकरी..
निश्चिंत फुले मुक्त श्वास घेती
रक्षणकर्ते खंदे असतात कुंपणावरी..!!
*****सुनिल पवार....

II प्रेमावर बोलू काही II

II प्रेमावर बोलू काही II
*****************
किती सहज म्हणालीस तू
विसरून जा आता मला
मी घेईन ग समजून एक वेळ
पण कस समजावु आठवाणीला..!!
*******सुनिल पवार...

।। तुज विण ।।

।। तुज विण ।।
************
कविते विण रिक्त रकाने
शब्दा विण बोथट गाणे
तैसे तुज विण माझे
लुप्त झाले सारे तराणे..!!
********सुनिल पवार....

।। गहराई ।।

।। गहराई ।।
**********
आँखों की गहराई का
पता कब चलता है..
इसका कायल इंसान
अक्सर डूब जाता है..!!
****सुनिल पवार.....

II मन मनातले II

II मन मनातले II
*****************
वेदनेच्या हिंदोळ्यावर, मन दोलायमान होते
नासिबाच्या फास्यांनी, उलट चालायच ठरवले होते..
लागेना कितीही वेळ, बदलेल ही कातर वेळ
मनाने माझ्या मात्र, मनास समजावले होते..!!
***************सुनिल पवार..........

।। शाप ।।

।। शाप ।।
*********
कोणाचा शाप आता कोणास भोवतोय
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरतोय..
वाढवले ज्यांनी अनेक खस्ता खाऊन
त्या माय बापास त्यांचा बाळ छळतोय..!!
**************सुनिल पवार.......

मंगळवार, २४ मार्च, २०१५

II नजर II

II नजर II
*********
नजर नजर की बात है
नजर नजर ना आती है..
नजर के सामने होती है
नजर अंदाज कर जाती है..!!
***********सुनिल पवार......

मंगळवार, १७ मार्च, २०१५

II अर्थ प्रेमाचे II

*******शुभ रात्री*******
*********************
पाहता नभात मज
प्रेमाचे अर्थ खरे कळतात..
लुकलुकणारे तारे जेव्हा
कोणाच्या इच्छेसाठी नीखळतात..!!
********सुनिल पवार....

II स्पर्धा II

II स्पर्धा II
**********
पाहून त्या स्पर्धा
सर्द का झालो मी..
दर्दी होतो कुठे..
बेदर्द झालो मी..!!
*****सुनिल पवार...

।। काटा ।।

।। काटा ।।
*********
दुभांगल्या प्रितिच्या वाटा
उसळल्या अश्रुंच्या लाटा..
जपले हळुवार फुलास तरी
अवचित रुतला काटा...!!
********सुनिल पवार...

।।स्वार्थी/लाभार्थी।।

।।स्वार्थी/लाभार्थी।।
********************
पावलो पावली भेटतात स्वार्थी
टाळूवरच्या लोण्याचे लाभार्थी
ठेवाल विश्वास गळा कापतील
सर्व दूर असते त्यांचीच कीर्ति..!!
*********सुनिल पवार........

।।कुठे शोधु रामाला ।।

।।कुठे शोधु रामाला ।।
*****************
ऐकलय मी,
उद्धारलेस तू अहिल्येला
मग का,
फास माझ्या गळ्याला
जगी तुझ्या,
पुजती सारे दामाला
तूच सांग,
कुठे शोधु रामाला...!!
*******सुनिल पवार....

||प्रेम||

||प्रेम||
******
संकेत जगाचे
झुगारुन देते
बंड पुकारते
प्रेम वेडे..
***सुनिल पवार***

शनिवार, १४ मार्च, २०१५

।। रे पावसा ।।

।। रे पावसा ।।
**********
भावनेशी न तुज घेणे देणे
भिजवणेच रे तुझे काम
भिजवण्यात तुझ्या आठवतो मज
कधी शाम तर कधी राम..!!
********सुनिल पवार...

।। तुझा कृपाभिलाषी ।।

।। तुझा कृपाभिलाषी ।।
*******************
का रे असा अवेळी रडतोस
तुझ्या बरोबर मी ही अश्रु ढळतो..
तुझ मला माहीत नाही तू का रडतो
तरी ही माझा जीव मात्र उभा जळतो..!!
*****तुझा कृपाभिलाषी*****
एक शेतकरी

।। अवकाळी ।।

अवकाळी..

तुझ्या अवकाळी येण्याने 
तुझी सरबराई राहून जाते..
अश्रु तरळतात डोळ्यात
उभंं पिकही वाहून जाते..!!
--सुनिल पवार..

गुरुवार, १२ मार्च, २०१५

।।सल।।

।। सल।।
********
सल अंतरात
ओठावर हास्य
जाणिले रहस्य
कुणी नाही..!!
****सुनिल पवार..

बुधवार, ११ मार्च, २०१५

।। पूर्वांचली ।।

पूर्वांचली उगावता रवी..


पूर्वांचली उगावता रवी
क्षितिजा भाळी सजते लाली..
न जाणे कुठून कशी मग
गोड उषेच्या रुजते गाली..!!
--सुनिल पवार..

।। तारे ।।

*******शुभ रात्री*******
पाहता नभात मज
प्रेमाचे अर्थ खरे कळतात..
लुकलुकणारे तारे जेव्हा
कोणाच्या इच्छेसाठी नीखळतात..!!
********सुनिल पवार....

II ये एकवार परतुनि II

II ये एकवार परतुनि II
**********************
तू निघून काय गेलीस..
आला विरह बघ छळायला..
ये एकवार परतुनी सखे
प्रेम लागलाय मज कळायला..!!
****************सुनिल पवार.....

II तुझ्या वीना II

II तुझ्या वीना II
****************
तुझ माझ जमेना
तुझ्या विना करमेना..
आग मनी प्रेमाची
शमता ना शमेना..!!
*******सुनिल पवार..

।। श्वास तू आभास तू ।।


।। श्वास तू आभास तू ।।
*******************
श्वास तू आभास तू..
जगण्याची माझी आस तू..
तुजवीण देह हां निष्प्राण..
विश्वास माझा खास तू..!!
*************सुनिल पवार....

II छबी II

II छबी II
*********
रम्य निसर्ग सानिध्यात..
रममाण अशी वाचनात..
एक छबी तुझी लाघवी..
बंधिस्त माझ्या मनात..!!
*************सुनिल पावर...

II कधीतरी II

II कधीतरी II
*************
कधी तरी उगवेल ती पहाट
बदलेल समाजाची वहिवाट
नसेल कोणी (पुरुष) प्रधान
मिळेल स्त्री ला नित्य संम्मान..!!
********सुनिल पवार........

II सवय II

II सवय II
*********
कसली ही सवय जीवघेणी
सरड्या परी रंग बदलणारी..
जगण्याच्या आणा भाका घेवुन..
मरणाच्या खाईत ढकलणारी..!!
**************सुनिल पवार.......

।। प्रीत भाव ।।


।। प्रीत भाव ।।
************
नित्य स्वप्नात वसे
तुझ्याच प्रेमाचा गाव..
नको नजर चोरु अशी
दिसे नजरेत प्रीत भाव..!!
********सुनिल पवार..

।। घर काटेरी ।।

। घर काटेरी ।।
**************
दिलेस मज काटे जरी
हसत मी स्वीकारले..
एकदाच वळून बघ तरी
घर काट्यावर साकारले..!!
*******सुनिल पवार......

।। रममाण ।।

।। रममाण ।।
***********
रममाण भासतेस तू
आपल्याच भाव विश्वात...
कोण आहे ग मनात..??
का नजर अशी शून्यात..!!
*******सुनिल पवार....

II वेदना II

II वेदना II
***********
नकोशी वाटते कोणास तरी,
भावतात तिचे बोल फार..
कवितेच्या भाव विश्वात,
वेदनेस त्या मोल फार..!!
**********सुनिल पवार.....

।। पांढरा रंग ।।

।। पांढरा रंग ।।         

 

सर्व रंगात

मला पांढरा रंग आवडतो..

कारण

प्रत्येक रंगात तो सहज मिसळतो..

रंगून रंगात

तो त्याचाच होवून जातो..

तरी आपले अस्तिव

तो ठळकपणे दाखवून देतो..

असा हा पांढरा रंग

खरा अवलिया असतो..

मूजोर रंगासही

तो लीलया मवाळ करतो..!!

--सुनील पवार..

रविवार, ८ मार्च, २०१५

।। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
============================
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
नभ ठेंगणे भासावे..
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व हे सारे वसावे..!!
***सुनिल पवार....✍🏽

शुक्रवार, ६ मार्च, २०१५

।। कवन ।।

।। कवन ।।
*********
रंगलेत हात तुझे मेहंदीने
माझ्या काळजाचं झालयं हवन..
सरली होळी, संपली धूळवड
मागे उरलयं आठवणीचं कवन..!!
**********सुनिल पवार....

।। रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ।।

।। रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
**************************
छेड़ू नको रे कान्हा
नको मारू पिचकारी..
शामल रंगात रंगली रे
तुझीच राधा बावरी..!!
*******सुनिल पवार...

गुरुवार, ५ मार्च, २०१५

II होळीच्या सप्तरंगी शुभेच्छा II


II होळीच्या सप्तरंगी शुभेच्छा II
**************************
उत्सव होळीचा, उत्सव संस्कृतीचा
.अनितीस जाळून, सद् भाव जपण्याचा.!!
उत्सव तनाचा, उत्सव मानाचा
विसरून मतभेद,मनोमिलन घडविण्याचा..!!
उत्सव नात्याचा, उत्सव प्रेमाचा
रंगून तयाच्या रंगात, चिंब चिंब भिजण्याचा...!!
****************सुनिल पवार.........
 

।। सांग ना रे माझ्या मना ।।


।। सांग ना रे माझ्या मना ।।
**********************
कोरडे रुक्ष झाले जगणे
शून्य झाल्या का भावना..
कधी रे उसळून येशील
सांग ना रे माझ्या मना..!!
********सुनिल पवार.....

।। घर उन्हाचे ।।


।। घर उन्हाचे ।।
**************
उन्हाच्या माझ्या घरास
मेहनतीच्या चार भिंती..
घामाचा त्यास गिलावा
अन समाधानाची माती..!!
*******सुनिल पवार..

सोमवार, २ मार्च, २०१५

।। रहाट गाड़े ।।


।। रहाट गाड़े ।।
*************
माणसाचे गुण चक्क ऋतुत उतरले..
रंग आता त्यांनीही बदलले..
कधी आग कधी राग कधी अनुराग..
रहाट गाड़े उलटे चालले..!!
********सुनिल पवार....

।। फाल्गुन पाऊस ।।

।। फाल्गुन पाऊस ।।
*****************
आता पाऊस ही वेडावला
बघ, असा अवेळी बरसला..
चिंब तुज भिजवण्या तो
सवे फाल्गुन घेवून आला..!!
**********सुनिल पवार.....
 

।। स्वप्न भास ।।


।। स्वप्न भास ।।
**************
सुटले हात कवटाळले विरहास
सुटता सुटेना परंतु माझी आस..
आठवाणीच्या त्या प्रत्येक मार्गावर
छळतो मज हां स्वप्न भास..!!
********सुनिल पवार.....

II सोनपरी II

II सोनपरी II
*************
आकांक्षाचे नव पंख लेवून
अवतरली पहा सोन परी..
लिंगभेदास मुठमाती देऊन..
स्वागत करा तिचे घरो घरी..!!
*************सुनिल पवार.....

II मनाच्या गाभाऱ्यात II

II मनाच्या गाभाऱ्यात II
**************************
मनाच्या गाभाऱ्यात मनाचा संग
मनाच्या संगतीला आठवणीचे रंग..
आठवणीच्या रंगावर भावनेची चौकट
भावनेच्या चौकटीत मन माझे दंग..!!
*******************सुनिल पवार.......

II प्रेम II

II प्रेम II
********
पटणार नाही तुला कधी
मला पक्के ठावुक आहे..
भासले तुज कठोर जरी
प्रेम माझे भावुक आहे..!!
****************सुनिल पवार...

II अबोल नाते II

II अबोल नाते II
****************
तुझे नि माझे अबोल नाते
अंतरात ग वसले आहे..
भावनेच्या तरल बंधनात
मन अलगद फसले आहे..!!
*************सुनिल पवार....

|| धडे ||

|| धडे ||
======
बाबा तुमच्या शिस्तीचे धडे
रुचले नव्हते त्या क्षणाला..
मात्र तुमच्या भूमिकेत वावरता
आज सहज पटले मनाला..!!
***सुनिल पवार...✍🏼