गुरुवार, २१ मार्च, २०१९

तुझ्या रंगात...

चिंब झाले मी, दंग झाले मी..
कान्हा तुझ्या रंगात, रंग झाले मी..!!
***सुनिल पवार...✍️

रंग..

रंग..
किती वर्षे झाली
रंग आपले वाटले नाहीत..
मावळून गेला सूर्य अन्
रंग पुन्हा एकवटले नाहीत..!!
***सुनिल पवार..✍️
Happy Holi...🖌️

डोह..

डोह..

कधी कधी कोऱ्या पानाप्रमाणे
मन कोरे ठेवण्याचा मोह होतो..
पण एक स्पर्श हळवा होतो
अन् पानासह मनाचा डोह होतो..!!
***सुनिल पवार...

मोकळे बोल...

मोकळे बोल...

कधी मोकळे बोल मनाने
ठेऊ नको अंतरात काही..
हे मौन तुझे छळेल तुलाच
शब्दाविन जीवनी रंगत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

शनिवार, १६ मार्च, २०१९

माझी ८ शब्दांची कहाणी..

माझी ८ शब्दांची कहाणी..
ती भेटली
प्रेमफुल फुलले
जातीच्या मातीत
दफन झाले..!!

स्वप्नांना जागवत..

स्वप्नांना जागवत..

स्वप्नांना जागवत 
अवचित पहाट अवतरते..
माणसाचे मन 
स्वप्नामागे धावत राहते..!!
--सुनील पवार..
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

राग...

राग...
संभ्रम वाढत जातो
राग काढत जातो..
माझ्या मनाचे पान 
मीच फाडत जातो..!!
**सुनिल पवार...✍️
संभ्रम वाढत जातो
राग काढत जातो..
माझ्या मनाचे पान 
मीच फाडत जातो..!!
**सुनिल पवार...✍️

ओंजळ...

ओंजळ..

असेल काही शंका तुला
तर समाधान करून घे..
तशी रिती आहे ओंजळ
पण लागेल ते भरून घे..!!
--सुनिल पवार..✍️
असेल काही शंका तुला
तर समाधान करून घे..
तशी रितीच आहे ओंजळ
पण त्यातूनही भरून घे..!!
***सुनिल पवार...✍️

उत्तर...

उत्तर...
प्रत्येक प्रश्नाचं नेमके
उत्तर तुझ्याकडे असते..
असं दरवळणारं कोणते
अत्तर तुझ्याकडे असते..??
**सुनिल पवार...✍️

शनिवार, ९ मार्च, २०१९

स्त्री..

🌹जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹
स्त्री..
म्हणजे अद्वितीय भक्ती
स्त्री..
म्हणजे अलौकिक शक्ती..
स्त्री..
म्हणजे जीवनाची आसक्ती
स्त्री..
म्हणजे चराचराची व्याप्ती..!!
**सुनिल पवार..✍️