II मैत्रीचे नाते II ========== पाण्यावर लिहता येणार नाही कदाचित पण पाण्यावर तरंगणारे लिहणे जमेल.. वाऱ्याच्या हिंदोळ्यावर मस्त झुलेल मैत्रीचे हे नाते नित्य दरवळे फुलेल..!! *****सुनिल पवार.....
|| गुरुकुल || ======== आदर्श गुरुकुल आता न राहिले जगी शिक्षणाचे बाजार मी पाहिले.. शिक्षकांच्या जागी आता सम्राट आले पैशाचे भुकेले नादार मी पाहिले..!! *******सुनिल पवार......