बुधवार, २९ एप्रिल, २०१५

II लोग II

II लोग II
*********
किसीको  छिक भी आती है
लोग रुमाल लेके दौड़ते.है..
तो कोई धुप में तपता है
लोग रोटी सेकने आते है..!!
********सुनील पवार.....

।। मूक शब्द ।।

।। मूक शब्द ।।
************
कधी कधी मूक शब्द
बरेच काही सांगून जातात..
भावना गुंतल्या मनाच्या
नकळत सैल करून जातात..!!
******सुनिल पवार....

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

।। फुलांच्या संगती ।।

***शुभ सकाळ***
***************
फुलांच्या संगती
मन हे रमावे
सकाळच्या पारा
हरी नाम घ्यावे...
****सुनिल पवार.....
****जय हरी****
🙏💐🙏💐🙏

II दोष II

II दोष II
********
आलेत काटेच वाट्याला
का दोष देऊ गुलाबाला..!!
कोण मारणार सांग मग
नित्य नेमे मरणा-याला..!!
*********सुनिल पवार.....

।। बहाने ।।

।। बहाने ।।
*********
समजेना तुझे वागणे
छळतात मज बहाने..
वाऱ्याच्या नशिबी का
नित्य असते वाहणे..!!
******सुनिल पवार.....

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

II दान II

II दान II
********
निसर्गाने दिले भरभरून दान
तरी माणसाने ओरबाडून घेतले...
बिघडले संतुलन अवेळी जरात्व आले
मरणानेही मग जगणे काढून घेतले..!!
**********सुनिल पावर.....

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

|| स्वार्थार्थ ||

|| स्वार्थार्थ ||
**********
भल्याचा ज़माना आता न राहिला
ज्याने त्याने आपला स्वार्थ पाहिला...
अपवाद नसे त्यास तू ही अन मी ही
नात्याच्या मधे आता अर्थ भरून राहिला...!!
********सुनिल पवार.....

मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

II वृक्षापरी जगावे II

II वृक्षापरी जगावे  II
*********************
निसर्गाकडून शिकवे
वृक्षा परी जगावे
पानगळ मागे सारून
मनमुक्त बहरावे...!!
****सुनिल पवार......

रविवार, १९ एप्रिल, २०१५

।। धिंडवडे ।।

।। धिंडवडे ।।
***********
शब्दांनी मेहरनजर व्हावे
माझ्यात असे काहीच नव्हते..
स्वप्नांचे मनोरे, आठवाणीचे कांगोरे
अन भावनांचे धिंडवड़े होते..!!
*****सुनिल पवार.......

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

।। स्वप्न ।।

।। स्वप्न ।।
**********
पाहिले जे स्वप्न कधी
मी आज पुन्हा रंगवत आहे
सुकले रंग जीवनाचे सारे
मी अश्रुत आता भिजवत आहे..!!
**********सुनिल पवार.......

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

।। चाय ।।

गरम चाय की प्याली..

गरम चाय की प्याली
चाहे गोरी हो या काली
सुस्ती भगाए चुस्ती लाये
यह चाय बड़ी मतवाली..!!
--सुनिल पवार..

।। कोकण पहाट ।।

।। शुभ सकाळ ।।
**************
गारव्याची साथ
उत्साही पहाट..
कोकणच्या भूमीचा
निराळाच थाट..!!
****सुनिल पवार...

।। शरपंजरी ।।

।। शरपंजरी ।।
************
नायनांच्या शरपंजरी
घायाळ जीवपडला आहे..
तुझ्या होकारासाठी
अजुनही अडला आहे..!!
*****सुनिल पवार....

।। भावनेच्या पलीकडे ।।

।। भावनेच्या पलीकडे ।।
*******************
भावनेच्या पलीकडे होते
एक स्वार्थी जग वसलेले
तुझ्या प्रातारणेच्या मागे
होते मज दिसलेले..!!
*****सुनिल पवार....

।।पाऊस।।

।।पाऊस।।
*********
पाणी पाणी पाऊस
परी रंग त्याचा वेगळा
कधी नाटवतो निसर्गाला
कधी ओरबाडतो सगळा..!!
*********सुनिल पवार......

|| मन ||

|| मन ||
*******
बरसला मुक्त पाऊस
मन का असे कोरडे...
एक प्रेम थेंबासाठी
मन अजुनही वेडे..!!
*****सुनिल पवार....

।। नाती अनमोल ।।

नाती अनमोल..
शोधु नको अर्थ नात्यात
नाती असतात अनमोल।
प्रेम ज्याचा उच्च कळस
विश्वास त्याचा पाया खोल।
--सुनिल पवार..✍🏼

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

।। भ्रमर ।।

।। भ्रमर ।।
*********
वेडा भ्रमर फुलास भुलला
मधु गंधाने पुरता नादावला
नकळत तयाच्या प्रेमात पडला
अवचित पाकळीत मग विसावला..!!
*****शुभरात्री*****
************सुनिल पवार....

।। इश्क ।।

।। इश्क ।।
**********
कहते है लोग इश्क होता है आवारा
मगर इश्क को ना यह इल्जाम गवारा...
फितरत होती इंसान की आवारगी
मगर पिसता इसमे अक्सर इश्क बेचारा..!!
**********सुनिल पवार...

।। भय ।।

।। भय ।।
********
मरणाचे भय नाही
भय येथे जगण्याचे
काळिमा माणुसकीला
अमानुष त्या वागण्याचे..!!
*******सुनिल पवार....


II निवडुंग एकाकी II


II निवडुंग II
दूर दूर एकाकी राहणारा निवडुंगही
जगण्याची खरी कला शिकवतो...
खडतरशा आपल्या काटेरी जीवनात
मनमोहक आशेचा फुलोरा फुलवतो..!!
***सुनिल पवार...✍️


II खेळ मनाचे II

II खेळ मनाचे II
****************
मनाचे खेळ हे कधी
वाटतात मनास बरे..
आभासी जग हे जरी
नकळत भासते खरे..!!
*********सुनिल पवार.....

II बेरीज/गुणाकार II

II बेरीज/गुणाकार II
********************
बेरजेसशी माझे सुत चांगलेच जुळते..
गणित प्रेमाचे मला इतकेच कळते..
वाजाबाकी नेहमीच जीवास छळते..
अन गुणाकारात द्विगणित फळते..!!
**************सुनिल पवार.....

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

II माझ्या मना II

II माझ्या मना II
****************
विरहात तुझ्या
जीव वेडा पिसा
सावरू ग कसा
माझ्या मना..!!
****सुनिल पवार..

II सल काट्याची II


II सल काट्याची II
******************
गुलाबास सल काट्याची
खंत आल्या वाट्याची..
कळे ना त्यास नसे ती भीती
निष्टुर कोणी ओरबाडण्याची..!!
*************सुनिल पवार...

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

II मैत्रीचा अभ्यास II

II मैत्रीचा अभ्यास II
*******************
मैत्रीचा अभ्यास
करावा हमखास..
नको काठावर
व्हावे फुल पास..!!
****सुनिल पवार...

II सपने II

।। शुभरात्री ।। GOOD NIGHT ।। शब्बा खैर ।।
***************************************
आँखों में नींदे
निंदो में सपने..
तहे दिल से चाहो
तो मिलेंगे अपने..!!
*****सुनिल पवार.....

II उपरवाला II

II उपरवाला II
**************
ये अलग बात है के..
उपरवाला सबको देता है..!!
फिर भी..उसकी चौकट पे आके
हर इंसान रोता है..!!
********सुनिल पवार......

II घोटाळा II

II घोटाळा II
************
जग सुंदर दिसेल ह्या भाबड्या आशेने
मी डोळ्यावर रंगीत चश्मा चढ़वला...
पण नेमका विसरलो डोळे उघडायला
अन व्हायचा तोच घोटाळा झाला...!!
***************सुनिल पवार...........

II तो आणि ती II

II तो आणि ती II
*****************
नेहमीच उशिरा येणारा तो
अन दारात वाट पहाणारी ती..
ठाऊक असते तिला उशिरा येणार तो..
तरीही...
क्षणिक विरहाने व्याकुळ होणारी ती..!!
***********************सुनिल पवार.......

।। सखे साजणी ।।

।। सखे साजणी ।।
****************
तिच्या प्रेमाची अदा निराळी
दिसते छबी सांज सकाळी..
असते तीच ध्यानी मनी
म्हणतो मी तीज सखे साजणी..!!
*****सुनिल पवार...

II शायरी II

II शायरी II
************
दो लब्जो की काहानी..
होती है शायरी..!!
हर यादों की जुबानी..
होती है शायरी..!!
कभी प्यार छलकता जाम..
होती है शायरी..!!
तो कभी दर्द बहता पानी..
होती है शायरी..!!
*******सुनील पवार.....

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

II गुलमोहर II

II गुलमोहर II
*****************
नव्हते काही मनात गवसले अकस्मात
शीतल चांदणे जसे पडले भर उन्हात..
भेटीने तुझ्या हृदयी वसंत फुलला
ग्रीष्मातही मनी गुलमोहर फुलला..!!
***************सुनील पवार......