शुक्रवार, ८ मे, २०१५

II ओंजळीतले प्रेम II

II ओंजळीतले प्रेम II
********************
आलीच आहेस आता
तर जरा बोलून जा..
ओंजळीतले प्रेम माझे
शब्दात पुन्हा तोलून जा..!!
*********सुनिल पवार....

||नाते||

||नाते||
******
बालपणीच गुंफले जाते
तेच असते खरे नाते
मोठेपणी अर्थाच्या जात्यात
भरडले जाते तेच नाते..!!
*****सुनिल पवार....

।। वरात ।।


।। वरात ।।
*********
नवरा नवरीची आली वरात
वेळ झाला जाईना घरात
व-हाडयांनी अडवली वाट
बाटली बाई नाचली जोरात..!!
*******सुनिल पवार.....
 

बुधवार, ६ मे, २०१५

II का कसे II

II का कसे II
*************
का कसे नित्य मज छळे..
प्रेम कसे ना तुज कळे..
विरह का जीवास जाळे..
सहवास तुझा दूर पळे..!!
**********सुनील पवार......

मंगळवार, ५ मे, २०१५

|| चाहत ||

|| चाहत ||
**********
जिंदगी से,
ना कोई शिकवा है
ना ही कोई शिकायत है..
करे रुसवाई लाख जिंदगी
बरकरार अब भी चाहत है..!!
*******सुनिल पवार....

II दुनियादारी II

II दुनियादारी II
***************
कदम से कदम मिलाना..
ना समझो बात बुरी..
मगर..
सोच समज के कदम रखना है जरुरी..
सलामत रहे तेरी मेरी यारी..
बाकी छोड़ यार दुनियादारी..!!
*************सुनील पवार..

|| गुलमोहर ||

गुलमोहर.. गुलमोहराचे मज अप्रुप फार भर उन्हात येतो रंगास निखार.. माथ्यावर त्याच्या भास्कर स्वार तरी शीतल छायेचा होतो आधार..!! --सुनिल पवार..✍️

646
People Reached
15
Engagements
32
1 Share
Like
Comment
Share

।। आलय ।।

।। आलय ।।
**********
भरून आलय आभाळ आठवणींचं
पापाण्यातुन आज ओघळू लागलय
हृदयी जपलेल्या तुझ्या मुर्तीचा
बांधू पाहतोय मनात आलाय..!!
*********सुनिल पवार....

रविवार, ३ मे, २०१५

।। चंद्र पसारा ।।

�� शुभरात्री मित्रहो��
*************
।। चंद्र पसारा ।।
*************
कधी वृद्धि कधी लुप्त
कलेकलेचा खेळ न्यारा..
अवस पुनवेत बंदिस्त
जीवनाचा चंद्र पसारा..!!
******सुनिलपवार.....

।। समजेना मज ।।

।। समजेना मज ।।
***************
समजेना मज काय असे झाले
शब्द नकळत भावनेत फसले..
म्हणे कोण कधी काळजात बसले
का कोणास कधी रुक्ष भासले..!!
*******सुनिल पवार.......

।। माणुसकीचा मार्ग ।।

।। माणुसकीचा मार्ग ।।
*******************
सूर्य ओकतोय आग
गुलमोहर देतोय अनुराग
शिकवतोय जणू,
येऊ देत संकटे कितीही
सोडु नको माणसा,
माणुसकीचा मार्ग..!!
*******सुनिल पवार......

शनिवार, २ मे, २०१५

।। पहाट ।।

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
**********************
तुझ्या संगतीने
व्हावी जीवनाची पहाट
मार्गावर आपल्या
बघ सुर्य पाहतोय वाट..!!
******सुनिल पवार.......