गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

|| दृष्टिकोण ||


|| दृष्टिकोण ||
=========
प्रभाव खरा दृष्टिकोनाचा
अन फरक केवळ नजरेचा असतो..
कोणासाठी अर्धा खाली असतो
अन कोणी अर्धा भरलेला म्हणतो..!!
****सुनिल पवार...✍🏽🍷

II उडाके निंदे II

 II उडाके निंदे II
===========
उडाके निंदे हमारी सनम
तुम यु ही सो ना जाना..
बस इतनासा मानो केहना
कभी सपनो मे भी आना..!!
****$p...✍🏽 

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

|| जरिया/नजरिया ||

|| जरिया/नजरिया ||
=============
हर सपने को पाने का
एक जरिया होता है..
पर उसे पहचानने का
एक नजरिया होता है..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

II दिल/डील II



😊मिश्किली😊
==========
💝दिल/डील💝
=========
दिल के बदले दिल
दिल चाहे यह दिल..
गर मंजूर हो दिल
तो करवा दो डील..!!!
**$p...✍🏽😜

|| महसूस करो ||

|| महसूस करो ||
===========
इतना भी नहीं मुश्किल यारो
दिल की बातों को समजना..
बस महसूस करो धडकनो को
क्या कहती है हमें भी बताना..!!
*****सुनिल पवार....✍🏽

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

II लालसा II

🌺सुप्रभात🌺
==========
मागावं लागत नाही देवाकडे
तो समजून सारं देत असतो..
लालसा इतकी भरून माणसात
तो ओरबाडून सारं घेत असतो..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

II असता तू जवळ II

II असता तू जवळ II
============
असता तू जवळ सखे
मज नसते ग कसलीच तमा..
जगास साऱ्या करून उणे
मी असतो केवळ तुझ्यात जमा..!!
****सुनील पवार....

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

II फाटक्या माझ्या गोधडीला II

🌺शुभरात्री🌺
👀=====👀
फाटक्या माझ्या गोधडीला
आता शिवायला मी घेतलंय..
जग डोकावतंय छिद्रातून
बाईस्कोपची मजा लुटतंय..!!
***सुनिल पवार..✍🏽

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

II थंडीचे दान II

🌺सुप्रभात🌺
==========
घेऊन आली पहाट
गुलाबी थंडीचे दान..
उठेल जो लवकर
त्यालाच मिळेल मान..!!
****सुनिल पवार...✍🏽

अंगणातल्या तुळशीस

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
=================
अंगणातल्या तुळशीस
आला मंजुळेचा बहर..
रोम रोमास सुखावते
पहाटेची शीत लहर..!!
***सुनिल पवार....

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

🌺दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=
चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
***सुनिल पवार...✍🏽

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

|| निवडुंगा ||

|| निवडुंगा ||
========
कुंपणावरचा निवडुंग तू काटेरी
ना येणार प्रेम तुझ्या वाट्याला..
मखमली फुलांच्या त्या विश्वात
नव्हतीच जागा कधी काट्याला..!!
*****सुनिल पवार...✍🏽

II पर्वत II

पर्वत..

जरी आली विशाल वादळे
तरी पर्वत निश्चल दिसतात..
पण किंचितशा ओलाव्याने
मुरूम जसे विरघळतात..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| नजराणा ||

|| नजराणा ||
=========
हळुवार शब्दांचा नजराणा
मी तुझ्यासाठीच आणला..
तुझ्याच सुखासाठी सखे
मी शब्द कधी ना ताणाला..!!
****सुनिल पवार....

II पहाट II

🌹सुप्रभात🌹
==========
नेहमीच होते पहाट
प्रसन्न मनमोहक..
तरीही का व्हावं मग
मन नाहक विद्रोहक..!!
***सुनिल पवार..✍🏽😊

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

II आकाश II

🌺सुप्रभात🌺
==========
नजरेतले आकाश
मार्ग जरा खडतर
मनानेही व्हावे आता
तितकेच कणखर..!!
***$p...✍🏽

|| हुरहूर ||

|| हुरहूर ||
======
उठलेल्या काहुरात
असते मनाची हुरहूर..
आठवण समीप अन
असते ती दूरदूर..!!
***$p...

II मूक भावना II

🌺सुप्रभात🌺
==========
असतील जरी का त्या भावना
मूक अव्यक्त..
न सांगावे लागत जाणवतात सहज
ओल्या हृदयास फक्त..!!
****$p.....✍🏽