।। एक विचार ।। प्रत्येक विचार महत्वाचे असतात.. जे मनाच्या गाभाऱ्यात जन्म घेतात.. छोटे असोत वा मोठे असोत.. विचार नित्य विचार करायला लावतात..!! *चकोर* (सुनिल पवार)
II बोज II
आँसुओं के समंदरको जरा, आँखों में रहने दो..
बरसता है सावन, तो इसे बरसने दो..
बहते है अरमान तो कोई गीला नहीं..
गमो का बोज मगर, कुछ कम ज़रा होने दो..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
II ओझे II ज्यांनी जन्म दिला त्यांनी हसत झेलले.. ज्यांनी जन्म घेतला त्यांस जड़ झाले.. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. देवा तुझे गाड़े का उलटे हे चालले..!! *चकोर* (सुनिल पवार)
II लाट II स्पर्शून मन किना-यास..लाटे दूर किती जाशील.. ओलावा मम मनातला..सांग कसा तू नेशील..!! मन मनाच्या सागरात किती वेळ घुटमळशील जितकी दूर जाशील..तितकी तू तळमळशील..!! *चकोर* (सुनिल पवार)
II घर II भातुकलीच्या खेळात एक बरे असते.. मनाच्या कोपऱ्यात सहज घर करता येते.. तुटले जरी का खंत ती क्षणिक असते.. नव्या डावात पुन्हा नव्याने बांधता येते..!! *चकोर* (सुनिल पवार)