मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

तुम्हारे कहने से

तुम्हारे कहने से..


तुम्हारे कहने से
शायद लौट भी आएंगे।
पर ये तो बताओ
कैसे विश्वास दिलाओगें।
--सुनील पवार..✍️

बुधवार, १ जून, २०२२

तुजसाठीच वाटे

तुजसाठीच वाटे..


तुजसाठीच वाटे सजावे धजावे

तव शब्दांचे तनुवर मोरपीस फिरावे..

स्पर्श नजरेचा मन मोहरून जावे

अन् क्षणाने घ्यावे क्षणाचे विसावे..!!

--सुनील पवार..

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

आयुष्याचे गणित

 आयुष्याचे गणित..

काही मान्य तर काही अमान्य
आयुष्याचे गणित तसे नाही सामान्य।
काही गम्य तर काही अगम्य
किती मिळवले तरी शिल्लक शून्य।
--सुनिल पवार..✍️

मंगळवार, २७ जुलै, २०२१

वाट

 वाट ..


दूरवर जाणारी वाट

आपणास धूसर दिसत असते

पण तिथवर गेल्यावर कळते

ती तशी कधीच नसते।

--सुनील पवार..✍🏼

🌻सुप्रभात🌞शुभ सकाळ🌻

गुरू परब्रह्म परमेश्वर

 गुरू परब्रह्म परमेश्वर..


गुरुस जो गर्वित करतो

शिष्य तो खरा महान असतो।

गुरू परब्रह्म परमेश्वर

सर्व समस्यांचे समाधान असतो।

--सुनील पवार..✍🏼

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

दूधगंगेची सैर करून

 दुधगंगेची सैर करून 

सांजेला चंद्र उगवला।

भास्कर चकित झाला

अंमळ लवकर मावळला।

--सुनील पावर..

तुम्हारी तरह

 तुम्हारी तरह..


तुम्हारी तरह ही

मुझे नींद आती नही।

मगर 

हम दोनों में फर्क इतना है की

मैं अकेला

और तुम्हारे इर्दगिर्द

सितारे है कईं।

--सुनील पवार..