सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

II डाव II

II डाव II
********
प्रेम मला भासते जसा पत्त्याचा डाव
इथे राजा राणीस येतो भलताच भाव.
हरले जरी त्यात सर्वस्व तुमचे आमचे
तरी खेळावासा वाटतो पुन्हा एक डाव..!!
**********************सुनिल पवार.........
 

II प्रीत पतंगाची II

II प्रीत पतंगाची II
******************
प्रीत पतंगाची कशी आगळी वेगळी..
झेप घेई पतंग, दिवा पंख जाळी..
नाही तरी खंत, नसे कुठलाच आरोप
समर्पणाचे नाव प्रेम, सिद्ध करी वेळो वेळी..!!
*****************सुनिल पवार........

।। मनातलं मन ।।

।। मनातलं मन ।।
***************
घुसमटलेल मन व्यक्त होत काव्यात
आनंदलेल मन मुक्त होत काव्यात..
नुसतीच नसते हो शब्दांची जुळवणी
मनातल मन सुप्त असत काव्यात..!!
**************सुनिल पवार.........

II दरवळ II

II दरवळ II
***********
गंध फुलांचा का दरवळतो दुरवर
दरवळ म्हणू का म्हणू गहिवर..
साल काट्याची ती मानावी कुठवर
सोज्वळ नजरही आता रुतते खोलवर..!!
**********************सुनिल पवार.......

।। जीवलग ।।

जिवलग..
तुझ्या अनोख्या प्रेमाचे दर्शन
मला सलग होत असते..
नेहमीच माझ्या जीवाला छळून
मलाच जीवलग म्हणत असते..!!
***सुनिल पवार...✍🏽

।। जिंदगी ।।

।। जिंदगी ।।
**********
जिंदगी के राह पर
चलना तू संभलकर
इम्तेहान लेती है जिंदगी
रंग बदल बदल कर..!!
********सुनिल पवार

II भक्तीची शक्ति II

II भक्तीची शक्ति II
*****************
भक्तीच्या ह्या शक्तीला
नसे कोणतीच तोड..
अवडंबर ते नसावे
असावी कृतीची जोड..!!
*********सुनिल पवार...