चारोळी चकोर
बुधवार, ३ जून, २०१५
II एक झाड लाव अंगणी II
II एक झाड लाव अंगणी II
********************
ओरबाडू नको वट वृक्षास
असे वट पोर्णिमे दिनी..
ऐक पक्षांची दीन वाणी
एक झाड लाव अंगणी..!!
******सुनिल पवार..
।। टोल ।।
।। टोल ।।
×××××××
झाले टोल आता मुक्त
राहिले मोजकेच फ़क्त
खुश रहा कार भक्त
आणि हो
व्होट दया आम्हाला फ़क्त..!!
*****सुनिल पवार.....
II प्रचीती II
II प्रचीती II
**********
रंगले हरीच्या रंगी
भक्ती रसात न्हावुनी..
देतसे प्रचीती कान्हा
प्रतिबिंबात रूप दावूनी..!!
******सुनिल पावर....
।। सुख ।।
।। सुख ।।
×××××××
हरविण्याच्या ह्या खेळात
तू जिंकावे असे नित्य वाटते
तुझ्या जिंकण्यातच खरे
माझे सुख मला भेटते..!!
*****सुनिल पवार....
।। चिटोरा ।।
।। चिटोरा ।।
×××××××××
आठणीच्या चिटोऱ्यातले
शब्द काही धूसर झाले
वाचले मी पुन्हा पुन्हा
अर्थ ना त्याचे अजुन लागले..!!
*******सुनिल पवार....
(चिटोरा = चिठ्ठी)
|| आतुर ||
|| आतुर ||
×××××××
येशील कधी परतून
झाला जीव हा आतुर
सख्या तुज पाहण्या
नयन झाले फितूर..!!
****सुनिल पवार....
।। चीकू ।।
।। चीकू ।।
×××××××
चीकू जरी नाव माझे
औदर्य माझे मोठे..
गोडवा माझ्या अंतरी
सांगत नाही खोटे..!!
****सुनिल पवार...
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)