मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

|| सावित्रीच्या लेकींनो ||

|| सावित्रीच्या लेकींनो ||
=●=●=●=●=●=●=●=
तुमच्यातील सक्षमतेला नवी ओळख दया
ते अश्रु नयनातले आता जाळून टाका..
हव्या कशास त्या कुबड्या सहानभूतिच्या
सावित्रीच्या लेकींनो सन्मानाने जगणे शिका..!!
******सुनिल पवार.....

II अंती जगी II

II अंती जगी II
==========
ना पायपोस काही राहिला
सांगा माणूस कोणी पाहिला..
चिकटवुन लांच्छने ह्याला त्याला
कोरडाच अंती जगी राहिला..!!
*****सुनिल पवार....

II सावित्रीबाई फुले II

II सावित्रीबाई फुले II
==============
कर्मठांचे विरोध झुगारून
घेतला स्त्री शिक्षणाचा वसा
अनंत यातना अवहेलना सोसून
उमटविला तुम्ही जगात ठसा..!!
*****सुनिल पवार...
★सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा★

|| निर्माल्य ||

|| निर्माल्य ||
=●=●=●=●=
वाट तुझी पाहीन
फूल नित्य वाहीन..
स्वीकार न स्वीकार
निर्माल्य मी होईन..!!
●●●●●●●●●●●●●
****सुनिल पवार...

|| कधीतरी ||

|| कधीतरी ||
=●=●=●=●=
कधीतरी बघ माझ्यासाठी आरशात
सलज्ज होशील आठवता मनात...
झुकेल नजर तुझी अलवार खाली
असेन तुजसवे मी त्या क्षणात..!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 *****सुनिल पवार....

II उठा उठा श्री महागणपती II

🌹सुप्रभात🌹
=●=●=●=●=
उठा उठा श्री महागणपती
पहाट समयी करितो आरती..
सुखकर्ता तू दुखःहर्ता तू
जीवन रथाचा तूच सारथी..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार.....

भल्या पहाटे

भल्या पहाटे..
देह सृष्टीचा थंडीने सिमटला
त्यात आलाय वारा भराला..
भल्या पहाटे सूर्य उगवला
देण्यास उबारा चराचाराला..!!
--सुनील पवार.