सोमवार, २ मे, २०१६

|| उद्रेक ||

|| उद्रेक ||
=======
बोथट झाल्या संवेदना जिथे
उद्रेक तिथे होणार कसा..?
अश्रु ढाळतोय महाराष्ट्र अन
कोरडा पडलाय पाण्याचा घसा..!!
*****सुनिल पवार.....

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

|| गणित आयुष्याचे ||

==============
|| गणित आयुष्याचे ||
==============
आयुष्याची गणितच निराळी असतात...
क्षणमात्रे सुटल्या सारखी वाटतात...
अचानक काही समीकरणे बदलतात...
सर्वस्व उणे होते मात्र काही सेकंदात..!!
****सुनिल पवार....

|| विरोधाभास ||

|| विरोधाभास ||
=◆=◆=◆=◆=◆=
दुष्काळ...
पेटलेल्या, होरपळलेल्या गावात
पाण्याचा भीषण दुष्काळ होता..
हा विरोधाभास का आभास न जाणे
मात्र बाटलीबंद सुकाळ होता..!!
***सुनिल पवार....✍️

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

II मुलाकात II

II शुभरात्री II
========
छोटीसी है रात
और लंबे खयालात..
मूँद के आँखे
अब करते मुलाकात..!!
****सुनिल पवार....

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

II चैत्र सोहळा II

II चैत्र सोहळा II
==========
फुलला सुर्याचा मळा
रंगला चैत्र सोहळा..
सजे पळस स्वागता
लेऊन केशर टिळा..!!
******सुनील पवार....

शनिवार, १९ मार्च, २०१६

|| पाणी वाचवा ||

|| पाणी वाचवा ||
=◆=◆=◆=◆=◆=
अनिष्ट असंस्कृत प्रथांना
निश्चये तुम्ही होळीत जाळा..
पाणी हेच जीवन आपले
अपव्यय पाण्याचा टाळा..!!

***सुनिल पवार...
****
तरंग's photo.

मंगळवार, ८ मार्च, २०१६

|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
एक दिवसाचा मान, त्यातही समाधान..
गुलाबाने घेतले जणू काट्यांचे वरदान.!!
शुभेच्छेचे पुष्प आज, चहुओर दरवळेल..
पुन्हा तेच निर्माल्य, अन तोच कूड़ादान..!!
****सुनिल पवार.....