सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

II उत्तर II


🌺सुप्रभात🌺
==========
शोधूनही सापडत नाही
अशीच काही उत्तरे असतात..
कुणा मुखी दरवळणारी
तशीच काही अत्तरे असतात..!!
****सुनिल पवार....✍🏽🌺

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

|| भाव मनाचे ||

|| भाव मनाचे ||
==========
चिंतातुर सारे भाव मनाचे
सांग मना लपवावे कसे..?
किती लाविले चेहऱ्यावर चेहरे
चेहऱ्यास परी हासवावे कसे..??
****सुनिल पवार.....✍
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)

|| फिरून आज ||

|| फिरून आज ||
===========
जपले होते जे अंतरात आजवर
ना दिसले कधी भाव चेहऱ्यावर..
काय घडले असावे नेमके कारण
फिरून आज ते आले वाऱ्यावर..!!
****सुनिल पवार....✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)

|| हिंदोळा ||


|| हिंदोळा ||
========
क्षणाचाही विलंब,विरह
छळतो प्रेमी जीवाला..
आशंकेच्या हिंदोळ्यावर
नकळत झुलवतो प्रेमाला..!!
***सुनिल पवार....✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

|| विचारचक्र ||

|| विचारचक्र ||
=========
विचारांचं चक्र मनात
निरंतर चालत असते..
मौनातले भाव नकळत
मौनातच खोलत जाते..!!
***सुनिल पवार...✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

|| अलबम स्मृतींचा ||


|| अलबम स्मृतींचा ||
============
स्मृतींचा अलबम सोबत बाळगल्याने
कळते आपणास आपण कुठे होतो..
मग भलेही पोहचो हात आभाळाला
मातीशी घरोबा सहज राखता येतो..!!
*****सुनिल पवार....✍🏽

|| कारण ||

|| कारण ||
=======
तुझ्या न येण्याचं सखे
सांग, कारण काय असेल..?
माझ्या मनाच्या हुरहुरीचं
सांग, निवारण काय असेल..?
****सुनिल पवार...✍🏽