सोमवार, १३ मार्च, २०१७

|| सण होळीचा ||

|| धुळवडीच्या रंगीत शुभेच्छा ||
🕺🏻===============🕺🏻
रंगी रंगून रंगाच्या
रंग दिसतो वेगळा..
वाहे आनंदाचा झरा
सण होळीचा आगळा..!!
***सुनिल पवार...✍🏽

रविवार, ५ मार्च, २०१७

|| घे जाणून ||

|| घे जाणून ||
=========
तुझ्या छबीत रे सारे
विश्व माझे दडलेले..
घे जाणून शब्दांतून
प्रेम माझे जडलेले..!!
***सुनिल पवार..✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील चारोळी)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-67

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

|| शुन्य ||

|| शुन्य ||
======
मागे उरावे बाकी काही
अट्टाहास हा उगाच दिसतो..
अंतिम सत्य केवळ शून्य
जीवनाचा हाच नियम असतो..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| सरिता ||

|| सरिता ||
=======
जरी आज दिसली सीमीत सरिता
उद्या तीच ओसंडून वाहणार आहे..
घालाल किती हो बांध मनावर
सरिता सागरास मिळणार आहे..!!
****सुनिल पवार...✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील चारोळी)

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

|| बंद चिठ्ठीत ||

|| बंद चिठ्ठीत ||
=========
कोण जाणे काय असेल
बंद चिट्ठीत त्या लिहलेले..
धडधड निरंतर हृदयाची
अन ओठ मात्र शिवलेले..!!
****सुनिल पवार....✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)

II उत्तर II


🌺सुप्रभात🌺
==========
शोधूनही सापडत नाही
अशीच काही उत्तरे असतात..
कुणा मुखी दरवळणारी
तशीच काही अत्तरे असतात..!!
****सुनिल पवार....✍🏽🌺

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

|| भाव मनाचे ||

|| भाव मनाचे ||
==========
चिंतातुर सारे भाव मनाचे
सांग मना लपवावे कसे..?
किती लाविले चेहऱ्यावर चेहरे
चेहऱ्यास परी हासवावे कसे..??
****सुनिल पवार.....✍
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)