चारोळी चकोर
रविवार, १० डिसेंबर, २०१७
|| कस्तुरी ||
|| कस्तुरी ||
=======
दरवळणाऱ्या गंधासाठी
का गं होतेस तू वेडीपीसी..
हे चंचल हरिणी मृगनयनी
तुझं आहे केवळ तुजपाशी..!!
***सुनिल पवार...
✍🏼
|| जिंदगी ||
|| जिंदगी ||
========
अक्सर लोग कहते है के
जिंदगी होती है जीने के लिए..
मगर तुम्हे देखा तब जाना के
जिंदगी है सिर्फ समाने के लिए..!!
***सुनिल पवार...
✍🏼
|| अक्सर ||
|| अक्सर ||
========
अक्सर हम महफ़िल में
साथ रौनक को ले जाते है..
लोग रौनक चुरा लेते है और
बदले मे मायूसी दे जाते है..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🤣
बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७
|| कोजागिरी ||
|| कोजागिरी ||
=========
कलेकलेचे खेळ खेळता
चंद्र छबी दुधाळ न्हाली..
कोजागिरीच्या चांदण राती
सखे तुझी आठवण आली..!!
***सुनिल पवार...
✍🏼
=========
कलेकलेचे खेळ खेळता
चंद्र छबी दुधाळ न्हाली..
कोजागिरीच्या चांदण राती
सखे तुझी आठवण आली..!!
***सुनिल पवार...
✍🏼
|| नभपरी ||
|| नभपरी ||
========
रंग तिसरा हा करडा
साडी भरजरी लेवून आली..
उत्सवाच्या या उत्साहात
सखी नभपरी होऊन आली..!!
***सुनिल पवार...
✍🏼
|| दुःख ||
|| दुःख ||
=======
कवटाळले तर छळते
पिटाळले तरच पळते..
आपले आपण ठरवावे
ते इतरांस कुठे कळते..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🌸
सुप्रभात
🌺
शुभ सकाळ
🌸
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
|| माय ||
|| माय ||
======
माय थापटे भाकर पृथ्वीवर
अर्पते चुलीस देहाचे सर्पण..
अन्नपूर्णा ती साऱ्या जगाची
लेकरासाठीचे अनोखे समर्पण..!!
***सुनिल पवार...
✍🏼
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)