गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

बहाणे...

बहाणे...
बहाण्यांचे हेच सांगणे
तुझ्यावाचून जीवन जगणे..
तू नसणार सोबत जरी
आठवणीत तुला पाहणे..!!
**सुनिल पवार...✍️

त्रास..

त्रास..
त्रास ह्याचा होत नाही की,
कोणी मला फसवत आहे..
त्रास ह्याचा होत आहे की,
मी का फसतो आहे..!!
**सुनिल पवार..✍️

नकाब...

नकाब...
पहचानना मुश्किल है
कौन अपना कौन पराया..
यहाँपर हर एक चेहरा
नकाब में नजर आया..!!
***सुनिल पवार...✍️

कॉफी आणि तिची आठवण..

कॉफी आणि तिची आठवण..
कॉफी आणि ती ही दोनच सूत्र
आठवणींना बांधून ठेवतात..
पहाटेच्या प्रसन्नतेसोबत
कातरवेळही सांधून ठेवतात..!!
***सुनिल पवार..✍️

हितगुज..

हितगुज..
तुला वेळ नसतो म्हणून
मी कागदाशी हितगुज करतो..
लेखणीच्या सोबतीने
मनाचा अलगुज वाजतो..!!
***सुनिल पवार...✍️

कविता...

कविता...
भावनांचा डोह ढवळून निघावा
शब्दांनाही उर्मी यावी..
अंतरात्म्याच्या गाभ्यातून
ती स्वयंभू प्रकट व्हावी..!!
***सुनिल पवार...✍️

कविता माझी ओळख...

कविता माझी ओळख...
ते मला हिरीरीने सांगत होते
की कविता काय असते..
मी म्हटलं, लेकराला काय सांगताय
की त्याची माय ही आय असते..!!
***सुनिल पवार...✍️