।। आठवणी ।।
किती उधळले क्षण वेडे..
हिशोब त्याचा लागत नाही..
आठवणी शिवाय आयुष्यात..
मागे काहीच उरत नाही..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
।। जळणे ।।
मेणबत्तीचे जगणे आले
रात्रीचे उजळणे आले
आपल्याच जगण्यावर असे
अश्रु ढाळत जळणे आले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
II भ्रांत II
स्वप्न सारे स्वप्नवत होते..
तुटले मनी खंत कशाला..
असता आठवण सोबतीला..
तू नसण्याची भ्रांत कशाला..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
II ओझे II
ज्यांनी जन्म दिला त्यांनी हसत झेलले..
ज्यांनी जन्म घेतला त्यांस जड़ झाले..
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..
देवा तुझे गाड़े का उलटे हे चालले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
II स्वप्न II
तुझ्या शिवाय नाही रंग जीवनी..
तूच माझे अंबर तूच अवनी..
सुखावतो मी नित्य तुज पाहुनी..
स्वप्न तुझेच वसते या लोचनी..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
।। संभ्रम ।।
संभ्रमाचे कोड़े मज..
अजुन नाही उलघडले..
मन होते वेडे बावरे..
इतकेच मज समजले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
II ओढ II
ओढ तुझ्या भेटीची..
का हुरहुर ही मनाची..
आठवण जाता जाईना..
गोड त्या क्षणाची..!!
*चकोर*
(सुनिल पवार)