बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

II ती II

II ती II
तिच्या त्या मोहक अदांवर..
मन अलगद जाउन बसते..
जिथे पाहावं तिथे तीच दिसते..
वाटेवर तिच्या डोळे लावून बसते..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


II सपने II

II सपने II
आँखों में सपने थे..
कहने को अपने थे..
तिनके के सहारे..
चले हम बचने थे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

II मागोवा II

II मागोवा II
मिटल्या पाऊलखुणांचा..
मी मागोवा अजून घेतो आहे..
सुकल्या पारिजातकाचा..
गंध अजून दरवळतो आहे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

II जीभ II

II जीभ II
जीभेने जे टूटते..
ते तोड़ने दातानाही शक्य नाही..
म्हणून सांगतो, जीभ तलवार आहे..
ती उच्चारते ते केवळ वाक्य नाही..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
 

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

II वादळ II

II वादळ II
माझ्याच वेदनेचे हे वादळ..
उध्वस्त करते मनास माझ्या..
आवरू पाहतोय आवरे ना..
आठवणीत जे वाहातंय तुझ्या..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

।। बांध ।।

।। बांध ।।
गोड त्या क्षणाचा
अंत का कटु व्हावा
बांध तन मानाचा
क्षणो क्षणी फुटावा..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


।। बहर ।।

।। बहर ।।
औट घटकेचा बहर
नंतर सुकून जायचे
फुलाने का मग
असे रुसुन बसायचे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)