गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

एकांत..😷

एकांत..😷
नको वाटतो संग कोणाचा
भला वाटतो मज एकांत..
नको प्रश्न, ना कसली खंत
व्हावे मनाने निःचिंत शांत..!!
**सुनिल पवार..🖋️

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

गुलाब...🌹

गुलाब...🌹
जपून ठेव गं सखे
मी दिलेला गुलाब प्रेमाचा..
सुकला तरी सुगंध देईल
हा गुणधर्म आहे त्याचा..!!
***सुनिल पवार...✍️
🌹Happy Rose Day🌹

देखावे...

देखावे...
समजून अजाण बनणे
कोणी तुझ्याकडून शिकावे..
तरी तू रंगवलेल्या चित्रांचे
मज भावतात देखावे..!!
***सुनिल पवार...✍️

🐻Happy Teddy Day🐻

🐻Happy Teddy Day🐻
देख कितना बडा है
टेडी तेरा दिवना..
तू मान मेरा कहना
उसे अपना बनाना..!!
**सुनिल पवार...✍️

Happy Kiss Day...💞

Happy Kiss Day...💞
ऐकण्यात आलंय
आज मुका दिवस हाय..
म्हणूनच की काय
कुणी बोलतच नाय..!!😀
***सुनिल पवार...✍️

कशास..🤔

कशास..🤔
ते बांधतात गुलाबी इमले
त्यांना सहज जमते ते..
मग काठावर बसून उगाच
नाव कशास ठेवतात ते..!!
***सुनिल पवार...✍️

अमर जवान....

आज ओशाळला असेल मृत्यूही
हे वीर जवाना, तुझे कलेवर पाहून..
सांडून आपले रक्त, देश रक्षणार्थ
तू हृदयात आहेस अमर होऊन..!!
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏