।। ग्वाही ।। ********* दिली होती प्रेमाची ग्वाही तू दिवस उगवताना.. सांज झाली तुझी पावले वळली हळूच माघारी.. कळवंडले क्षितिज सारे मन मनाचे माझे नाही उगवाला दिवस पुन्हा तो माझ्या दारी..!! *********** सुनिल पवार [चकोर]
||खरे प्रेम|| ********* नशीबवान असतात ती माणसे ज्यांना प्रेम मिळते खस्ता खाव्या लागतात नाहीतर प्रेम मिळण्यासाठी प्रेम मिळूनही काही कमनाशिबी ठरतात आयुष्य जाते मित्रांनो खरे प्रेम कळण्यासाठी..!! ************* सुनिल पवार [चकोर]
||अनोळखी ओळख|| ***************** अनोळखी ओळख आपली का ओढ तरी ही भेटीची..? जशी गाठ ऋणानुबंधाची जन्मो जन्मीच्या त्या प्रीतीची..!! **************** सुनिल पवार [चकोर]
।।शब्दांचे लेणे।।
*************
नाही कोणास देणे घेणे
तरी लागतो मी तुझे देणे
भग्न अवस्थेत उभे आहे
माझे शब्दांचे हे लेणे..!! *************** सुनिल पवार [चकोर]