शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

II जीवन संघर्ष II

II जीवन संघर्ष II
****************
जीवन एक संघर्ष आहे..
कधी दुखः कधी हर्ष आहे..
कधी कोरडे रुक्ष आहे..
तर कधी मखमली स्पर्श आहे..!!
*************
सुनिल पवार..

II कटाक्ष II

II कटाक्ष II
**********
मान वळवून सखे असे
क्रोधाचे द्वार खोलु नको..
बस एक कटाक्ष टाक..
बाकी काही बोलू नको..!!
************
सुनिल पवार

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*

II तिळगुळ घ्या II गोड गोड बोला II
***@@***
**मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा**
***************************************
म : मधाळ असावी नित्य वाणी
क : कटुता व्हावी सकल दूर
र : रत्नासम उजळावे जीवन सारे
स : सर्व सुखाचे यावेत घरात पुर..!!
क्रां : क्रांत व्हावे नित्य नवे यशों शिखर
त : तसेच जुळावे जीवनाचे सुर..!!
**************
सुनिल पवार
[चकोर]

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

II पतंग II

II पतंग II
**********
आयुष्याचा पतंग उंच लहरावा..
दोर मात्र त्याचा हाती असावा..
कधी सैल तर कधी घट्ट धरावा
पतंग जीवनाचा संतुलित दिसावा..!!
************
सुनिल पवार
[चकोर]

।। तिळगुळ घ्या ।। गोड गोड बोला ।।

।। तिळगुळ घ्या ।। गोड गोड बोला ।।
******************************
गुळाचा गोडवा ओठावर रुजावा
तिळाचा उबारा अंतरात असावा
संक्रातीचा असतो हाच सांगवा
शीत लहरित समतोल राखावा..!!
***********
सुनिल पवार
[चकोर]

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

।। अपना पराया ।।

।। अपना पराया ।।
***************
हमारा क्या है जो अपने पास रखेंगे.
जहा का है सब वही छोड़ जाएंगे
फिर क्यों यह अपना वह परया
भगवान समजते हम मेहमान जो घर आया...!!
***********
सुनिल पवार
[चकोर]

।। ज्योती ।।


।। ज्योती ।।
**********
अंधारास उजळते जशी ज्योती
मनास भावते तशीच प्रिती..
बघ ज़रा तू डोळे उघडून
नांदतात कसे दिवा आणि वाती..!!
***********
सुनिल पवार
(चकोर)