मंगळवार, ५ मे, २०१५
|| गुलमोहर ||
गुलमोहर..
गुलमोहराचे मज अप्रुप फार
भर उन्हात येतो रंगास निखार..
माथ्यावर त्याच्या भास्कर स्वार
तरी शीतल छायेचा होतो आधार..!!
--सुनिल पवार..✍️
3232
1 Share
Like
Comment
Share
रविवार, ३ मे, २०१५
।। चंद्र पसारा ।।
शुभरात्री मित्रहो
*************
।। चंद्र पसारा ।।
*************
कधी वृद्धि कधी लुप्त
कलेकलेचा खेळ न्यारा..
अवस पुनवेत बंदिस्त
जीवनाचा चंद्र पसारा..!!
******सुनिलपवार.....
।। समजेना मज ।।
।। समजेना मज ।।
***************
समजेना मज काय असे झाले
शब्द नकळत भावनेत फसले..
म्हणे कोण कधी काळजात बसले
का कोणास कधी रुक्ष भासले..!!
*******सुनिल पवार.......
।। माणुसकीचा मार्ग ।।
।। माणुसकीचा मार्ग ।।
*******************
सूर्य ओकतोय आग
गुलमोहर देतोय अनुराग
शिकवतोय जणू,
येऊ देत संकटे कितीही
सोडु नको माणसा,
माणुसकीचा मार्ग..!!
*******सुनिल पवार......
शनिवार, २ मे, २०१५
।। पहाट ।।
|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
**********************
तुझ्या संगतीने
व्हावी जीवनाची पहाट
मार्गावर आपल्या
बघ सुर्य पाहतोय वाट..!!
******सुनिल पवार.......
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


