सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

II कांदा II

II कांदा II
======
कांदा झालासे कळस
परी ढासळला पाया..
गेली शेताची रया
सावकार जमवे माया..!!
*****सुनिल पवार.....

II राख II

II राख II
=====
दग्ध मनाचे अवशेष ख़ास
राख नसे ही माझी आस..
जळले जरी प्रेम चितेत
भटकते नित्य आसपास..!!
*******सुनिल पवार......

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

II जादुई II

II जादुई II
=======
मुक्त मोत्यांची उधळण
का निसर्गाची रोषणाई..
मुग्ध करी मन मनास
अदा तुझी ती जादुई..!!
*******सुनिल पवार.....

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

|| पाऊस पसारा ||

|| पाऊस पसारा ||
===========
 या सम नाही दूसरा
आयुष्य जसे पाऊस पसारा..
कधी मोहक इंद्रधनुचा नजारा
कधी नुसता चिखल सारा..!!
******सुनिल पवार....


II सजली रजनी II

II शुभरात्री II
========
सजली रजनी
चंद्र तारे लेवुन..
पाहतो नजारा
मुग्ध मी होवून..!!
****सुनिल पवार...

II तुझ्या आठवणीत II

II तुझ्या आठवणीत II
==============
तुझ्या आठवणीत माझा
दिवस सारा गेला..
अंधार दाटे मनात अन
रात्रीचा पसारा झाला..!!
*********सुनिल पवार.....

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

|| गुरुकुल ||

|| गुरुकुल ||
========
आदर्श गुरुकुल आता न राहिले
जगी शिक्षणाचे बाजार मी पाहिले..
शिक्षकांच्या जागी आता सम्राट आले
पैशाचे भुकेले नादार मी पाहिले..!!
*******सुनिल पवार......