चारोळी चकोर
सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६
II आकाश II
🌺
सुप्रभात
🌺
==========
नजरेतले आकाश
मार्ग जरा खडतर
मनानेही व्हावे आता
तितकेच कणखर..!!
***$p...
✍🏽
|| हुरहूर ||
|| हुरहूर ||
======
उठलेल्या काहुरात
असते मनाची हुरहूर..
आठवण समीप अन
असते ती दूरदूर..!!
***$p...
II मूक भावना II
🌺
सुप्रभात
🌺
==========
असतील जरी का त्या भावना
मूक अव्यक्त..
न सांगावे लागत जाणवतात सहज
ओल्या हृदयास फक्त..!!
****$p.....
✍🏽
II भावना II
🌺
शुभरात्री
🌺
==========
निद्रिस्त ह्या भावना
जागवतेय कोण..
भिराभिरतात अंधारात
पाखरे स्वप्नाळू दोन..!!
***$p....
✍🏽
😊
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६
II संवाद II
II संवाद II
======
माझ्या एकांताचा संवाद
छळतो माझ्याच मनाला..
किती बोलावे लेखणीने
का ओरबाडावे कागदाला..!!
*****सुनिल पवार....
गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६
|| असा तिचा ||
|| असा तिचा ||
==========
असा तिचा हट्ट होता
जरा निगरगट्ट होता..
बहरलेल्या लेखणीचा
कागद जरा मठ्ठ होता..!!
******$p............
😊
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६
|| बीज ||
|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
🌺
=============
🌺
पाषाणावरही बीज रुजते
मूळ त्यासही घट्ट बिलगते..
औट घटकेच का होईना
सुंदर जीवन ते जगते..!!
****सुनिल पवार....
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)