सोमवार, १ जानेवारी, २०१८

|| वास्तव ||

|| वास्तव ||
========
पचत नाही कुणास वास्तव
हे खरे वास्तव आहे..
वास्तवाची वास्तविक मागणी
तितकीच अवास्तव आहे..!!
***सुनिल पवार...✍🏼🙂
🌻सुप्रभात🌻

|| चेहरा |

🙂|| चेहरा ||🙃
==========
चेहऱ्यामागचा चेहरा,
सहजासहजी दिसत नसतो..
प्रकाशित दिव्याखालीही,
नित्य अंधार वसत असतो..!!
***सुनिल पवार...

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

का..?

का..?
====
का काटेच देते हे जग
फुलांच्या बदल्यात..?
ना जाणे हे जग गुंतले
कोणाच्या बदल्यात..??
***सुनिल पवार...✍🏼

आरसा

आरसा..

हा आरसा का हल्ली
माझी दिशाभूल करतो..?
मी न्याहाळतो स्वतःस
पण चेहरा तुझा दिसतो..!!
--सुनिल पवार..✍🏼

|| मी/तू ||

|| मी/तू ||
=======
मी वाऱ्याचा वावर
तू निशिगंधाचा बहर..
मी आतुरतेचा क्षण
तू धुंद रात्रीचा प्रहर..!!
***सुनिल पवार...✍🏼

7,

शिशिराच्या अंगणात

🌺सुप्रभात🌺
::::::::::::::::::::
शिशिराच्या अंगणात
धुक्याचे पाऊल पडते..
शुभ्र मोत्यांची झूल
पानाफुलांवर चढते..!!
***सुनिल पवार...✍🏼

रविवार, १० डिसेंबर, २०१७

||मौनातला शब्द||

||मौनातला शब्द||
:::::::::::::::::::::::
शांत वाटणारा डोह
अंतरी खोल असतो..
तसा मौनातला शब्द
कधी अनमोल असतो..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌼सुप्रभात🌼शुभ सकाळ🌼