चारोळी चकोर
शुक्रवार, ८ जून, २०१८
|| छबी ||
छबी..
छबी तुझीच रे
साठवली मनात..
तू आलास अन्
उमटली थेंबात..!!
--सुनिल पवार..
✍🏼
पहाट
🌻
सुप्रभात
🌻
शुभसकाळ
🌻
===================
तू बरसलास अन्
पहाट बिलगली गारव्यास..
पानाफुलांवर सजली
शुभ्र मोत्यांची आरास..!!
***सुनिल पवार..
✍🏼
|| रंग ||
|| रंग ||
=====
हे सत्य असे का भास?
पण चित्र देखणे खास..
मोहक रंग या संध्येचे
तिचा लागे मनास ध्यास..!!
***सुनिल पवार...
✍🏼
("वळणावरच्या वाटा" मधून)
|| हळवा थेंब ||
|| हळवा थेंब ||
==========
प्रत्येक मनात असतो
पाऊस दाटलेला..
आठवणींच्या पानास
हळवा थेंब खेटलेला..!!
***सुनिल पवार....
✍🏼
स्वप्न
🌛
*शुभरात्री*
🌜
==========
का लपला चंद्र आज
कृष्णमेघांच्या मागे..?
मिटलेल्या नयनांतून
स्वप्न अजून जागे..!!
**सुनिल पवार...
✍🏼
|| पावसा ||
|
| पावसा ||
=======
होरपळलेल्या मनावर
तू थेंब शिंपडलेस पावसा..
अन काळजावर उमटला
मोरपिसाचा मोहक ठसा..!!
**सुनिल पवार..
✍🏼
|| तू आलास ||
तू आला अन्
गंध मातीचा
श्वासास बिलगला..
तू आला अन्
क्षण ओला झाला..!!
--सुनिल पवार..
✍🏼
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)