मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

चित्र...

रंगसंगतीचे चित्र अनोखे
देखणे सर्वात उठून दिसते..
सूर्याचे पाहिले किरण जेव्हा 
भूमीवरती अलगद उतरते..!!
***सुनिल पवार...✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

लिखित..

लिखित..
समजू नका की,
मी काहीच लिहीत नाही..
इतकेच की,
माझे लिखित वहीत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

चष्मा...🤓

चष्मा...🤓
प्रसंग ताणण्यापेक्षा
जाणणे गरजेचे असते..
चष्मा हा अभ्यासू हवा
तेव्हा कुठे वाचता येते..!!
***सुनिल पवार....✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

भाव...

भाव...
कोणाचा वधारलेला भाव
कमी व्हायला वेळ लागत नाही..
ज्याने भाव वाढवून ठेवला
तोही मग त्याला ठेवत नाही.!!
**सुनिल पवार...✍️
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

कदाचित..

कदाचित..
असेल तुला गर्व कदाचित
पण मलाही माझा स्वाभिमान आहे..
तुला टाळण्यास आता केलीय सुरवात
हे तर त्याचेच प्रमाण आहे..!!
***सुनिल पवार...✍️

वेदना...२

वेदना...
ती नकोशी वाटते जीवनात,
तरी तिचे बोल भावतात..
कवितेच्या भावविश्वात, 
वेदनेचे दिवाने दिसतात..!!
***सुनिल पवार...✍️

कळा

एक ओळ..☝️
जितका अधिक लळा, तितक्या तीव्र कळा..!!
***सुनिल पवार...✍️