मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

।। शुभ रात्री ।।

।। शुभ रात्री ।।
************
निजली पाखर घरटयात
चंद्र करितसे निगराणी
चांदण्याच्या सहवासात
धुंद दरवळते रातराणी..!!
**************
सुनिल पवार
【चकोर】

II आई बाप II


II आई बाप II
*************
शब्दांच्या बुडबुड्यात शोधतो मी जीवनाचे सार
तेच सार वास्तवात दाखवतात आई बाप..
सर्व समर्पणात लपले असते खरे समाधान..
दाखवून देतात आपणास आपले आई बाप..!!
************
सुनिल पवार
[चकोर]


।। आधार ।।

।। आधार ।।
करतेस जसा तू साज शृंगार
माझ्या शब्दास दे तसाच आधार
ताटकळले बघ ते तुझ्या दारात
नको करू ग जीवनात अंधार..!!
सुनिल पवार
[चकोर]
 

।। याचना ।।

।। याचना ।।
***********
याचना तरी किती करावी..
बहाणे तुझे नित्याचे झाले..
का विरह वेदनेस भाळी लिहिले
तुझ्याविना जगणे असह्य झाले..!!
****************
सुनिल पवार
【चकोर】

।। संकल्प ।।

।। संकल्प ।।
***********
धकाधकीच जीवन आपल
संकल्प त्यास हवे कशाला
हातावर पोट घेवून फिरतो
आणि दगड असतो उशाला..!!
*************************
सुनिल पवार
【चकोर】

।। गल्ला ।।

।। गल्ला ।।
*********
गल्ला भरू बाजार भरला
गल्ला कुठे मागे राहिला
साठवण्याच्या ह्या प्रक्रियेला
जो तो बँक म्हणू लागला..!!
**********************
सुनिल पवार
【चकोर】

।। व्यथा ।।

।। व्यथा ।।
**********
काजळ माझ्या आयुष्याचा
रंग तरी काय सांगवा..
राब राबुन शेतात अंती
देह फासावर टांगावा..!!
***********
सुनिल पवार
【चकोर】