चारोळी चकोर
सोमवार, २९ जून, २०१५
|| मैत्री ||
|| मैत्री ||
××××××
कळत नकळत जुळतात ऋणानुबंध
अवचित देतात मनास आनंद
मैत्रीचा असतो सर्वांनाच छंद
पण मैत्री असावी निर्मळ स्वच्छंद...!!
*******सुनिल पवार....
|| नाते ||
|| नाते ||
××××××
नाते असावे पावसाच्या धारे सारखे
बरसता जसा मिळतो धरणीस रुजवात..
अल्लड नदिस अवचित मिळते त्याची साथ
सामावते निश्चिंत सागराच्या हृदयात..!!
******सुनिल पवार....
शुक्रवार, २६ जून, २०१५
II बळ द्या पंखांना II
II बळ द्या पंखांना II
*******************
घेऊ दया झेप मज गगनी
घालू द्या गवसणी स्वप्नांना..
खुडू नका अवेळी कळीला..
जगण्याचे बळ द्या पंखांना..!!
**********सुनिल पवार....
|| गंध ओल्या मातीचा ||
|| गंध ओल्या मातीचा ||
××××××××××××××××
तुझा सहवास मज हवा हवासा वाटे
मिटल्या पापण्यांतुन नित्य मज भेटे..
ओल्या मातीचा गंध तोच दरवळे
आठवांच्या वाटे नयनी नीर खेटे..!!
*******सुनिल पवार....
गुरुवार, २५ जून, २०१५
|| मत मतांतर ||
|| मत मतांतर ||
×××××××××××
असेनात का मत मतांतर
अंतरात ते नसावे अंतर
प्रेम असते पवित्र सुंदर
जे वसते हृदयी निरंतर..!!
******सुनिल पवार...
|| तोच पाऊस ||
|| तोच पाऊस ||
×××××××××××
पुन्हा तोच पाऊस
पुन्हा तोच चिखल
गुंतल्या ह्या नात्याची
व्हावी कशी उकल..!!
****सुनिल पवार....
मंगळवार, २३ जून, २०१५
:II मन मनात II
:::II मन मनात II:::
*******************
मन मनात चाले मनाचा खल
क्षण क्षणात झुकतोय तुजकड़े कल..
राहून राहून राहते तीच मनात सल
दूर जाशी तू अन प्रयत्न माझे विफल..!!
***********सुनिल पवार......
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)