चारोळी चकोर
सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५
II मैत्रीचे नाते II
II मैत्रीचे नाते II
==========
पाण्यावर लिहता येणार नाही कदाचित
पण पाण्यावर तरंगणारे लिहणे जमेल..
वाऱ्याच्या हिंदोळ्यावर मस्त झुलेल
मैत्रीचे हे नाते नित्य दरवळे फुलेल..!!
*****सुनिल पवार.....
II कांदा II
II कांदा II
======
कांदा झालासे कळस
परी ढासळला पाया..
गेली शेताची रया
सावकार जमवे माया..!!
*****सुनिल पवार.....
II राख II
II राख II
=====
दग्ध मनाचे अवशेष ख़ास
राख नसे ही माझी आस..
जळले जरी प्रेम चितेत
भटकते नित्य आसपास..!!
*******सुनिल पवार......
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५
II जादुई II
II जादुई II
=======
मुक्त मोत्यांची उधळण
का निसर्गाची रोषणाई..
मुग्ध करी मन मनास
अदा तुझी ती जादुई..!!
*******सुनिल पवार.....
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५
|| पाऊस पसारा ||
|| पाऊस पसारा ||
===========
या सम नाही दूसरा
आयुष्य जसे पाऊस पसारा..
कधी मोहक इंद्रधनुचा नजारा
कधी नुसता चिखल सारा..!!
******सुनिल पवार....
II सजली रजनी II
II शुभरात्री II
========
सजली रजनी
चंद्र तारे लेवुन..
पाहतो नजारा
मुग्ध मी होवून..!!
****सुनिल पवार...
II तुझ्या आठवणीत II
II तुझ्या आठवणीत II
==============
तुझ्या आठवणीत माझा
दिवस सारा गेला..
अंधार दाटे मनात अन
रात्रीचा पसारा झाला..!!
*********सुनिल पवार.....
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)