बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

|| प्रेमात ||

|| प्रेमात ||
=◆=◆=◆=
असे होते का हो प्रेमात
किती लपवावं ते मनात..
कथन करतात डोळे क्षणात
गळून पडतात सारेच कनात..!!
******सुनिल पवार...❤

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

|| वरदान ||

प्रसन्नतेचे वरदान..

देऊन विसाव्याचं समाधान
निशा पावली अंतर्धान..
अवचित आली नवपहाट
घेऊन प्रसन्नतेचं वरदान..!!
--सुनिल पवार..

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

|| उगवली पहाट ||

��सुप्रभात��
=■=■=■=■=
मी बोलावले नाही
तरी ती आली..
गोड स्वप्नांना हळूच
हवा देती झाली..
वीचारता काय राव
ती कोण होती..
प्रसन्न उजळ कांती
पहाट उगवली..!!
��●●●●●●●��
***सुनिल पवार...

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

मैफिल

��सुप्रभात��
=●=●=●=●=
पाखरांची किलबिल ऐकण्या
कोवळ्या किराणांनी दाटी केली..
सजली मैफिल छान रंगली
पहाटेने हळूच ताटी उघडली..!!
*****सुनिल पवार....

|| तिळगुळ घ्या गोड बोला ||

|| तिळगुळ घ्या गोड बोला ||
=●=●=●=●=●=●=●=●=
तिळगुळ घ्या गोड बोला
मुहूर्त चांगला आहे मौन सोडा..
होऊ द्या कोत्या मनाच संक्रमण..
माणसांनो माणुसकीशी नात जोड़ा..!!
😊●●●●●●●●●●●●●😊
*****सुनिल पवार.....

II सवे किराणांची साथ II

🌹सुप्रभात🌹
=●=●=●=●=
सवे किराणांची साथ
उगवला सूर्य नभात..
तना मनातून व्हावा
दूर अंधार क्षणात..!!
****सुनिल पवार...

II स्वप्नांना लाभो II

🌹सुप्रभात🌹
=●=●=●=●=
रात्रीस मिळाले चंद्राचे दान
विसाव्यात येते स्वप्नांना उधाण..
पहाटेस दिले सूर्याचे वरदान
स्वप्नांना लाभो तसेच समाधान..!!
*******सुनिल पवार.....